

Leopard Attack on a dog in Nirgudasur. Multiple sightings reported. Residents demand immediate Forest Cage installation. Nirgudasur Dog survived the attack.
Sakal
निरगुडस : राखणदार कुत्र्याला बिबट्याने शिकार करून उचलून नेले परंतु कुत्र्याने बिबट्याचा प्रतिकार केल्याने बिबट्याला कुत्रे सोडून पळ काढावा लागला ही घटना निरगुडसर येथील वळसेमळा येथे बुधवार (ता.१५) रोजी नऊ वाजता घडली निरगुडसर परिसरात आणखीन दोन ठिकाणी बिबट्याचे दर्शन घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे,त्यामुळे वनविभागाने मेल्यावर ५० पिंजरे लावण्यापेक्षा जिवंतपणीच दोन तीन पिंजरे लावावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.