Pranali Benake : आधी खो खोचे मैदान गाजवले आणि आता गुन्हेगारी संपवण्यासाठी मैदानात

खो खो खेळामुळे वर्दीची आवड लहान पासून असल्याने देशसेवेसाठी एक पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न मनाशी बाळगले होते.
Pranali Benake
Pranali Benakesakal

निरगुडसर - खो खो खेळामुळे वर्दीची आवड लहान पासून असल्याने देशसेवेसाठी एक पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न मनाशी बाळगले होते. कोरोना काळातील पूर्णवेळ अभ्यास, खो खोमुळे मैदानावरील असलेला सराव आणि जिद्द चिकाटीच्या जोरावर शेतकरी कुटुंबातील राष्ट्रीय खो खो खेळाडू प्रणाली बेनके हीचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न साकार झाले आहे.

आंबेगाव तालुक्यातील वळती गावातील एका शेतकरी कुटुंबातील प्रणाली बारकु बेनके ही राष्ट्रीय खो खो खेळाडूंनी एक पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. यामुळे सर्व परिसरातून तिचे कौतुक होत आहे.

प्रणाली ही एक राष्ट्रीय खो खो खेळाडू असून तिने आत्तापर्यंत १७ राष्ट्रीय स्पर्धा खेळून १४ सुवर्णपदक मिळवले आहे. तसेच तीन वेळा महाराष्ट्र राज्य संघाचे कर्णधार पद भूषवले असून, तिन्ही वेळी राज्याला सुवर्णपदक मिळवून देण्यात तिने सिंहाचा वाटा उचलला आहे.

आंबेगाव तालुक्यातील रांजणी येथील नरसिंह विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पदवीचे शिक्षण पुण्यातील मॉडर्न विद्यालयात घेतले. साधारण २०२० मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एमपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली कोरोना काळातील वेळ पूर्ण अभ्यासासाठी दिला.

यातून या परीक्षेत तिला २५३ गुण मिळाले असून, ग्राउंडला १०० पैकी १०० गुण मिळाले आणि महाराष्ट्रातून १७०० जणांची निवड मुलाखतीसाठी झाली. त्यामध्ये राज्यात सर्वाधिक ३२ गुण प्रणालीला मिळाले आहेत. तिने खेळाडू कोट्यातून फॉर्म भरला होता परंतु खुल्या वर्गामधून पास झाली आहे.

प्रणाली बेनके म्हणाली की, एक पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न लहानपणापासूनच उराशी बाळगले होते. आणि खेळाडू असल्याने वर्दीची आवड होतीच, यासाठी अहोरात्र अभ्यास करून उराशी बाळगलेले स्वप्न सत्यात उतरल्याने मला खूप आनंद होत आहे, यासाठी माझे कुटुंबीय, खो खो प्रशिक्षक संदीप चव्हाण सर आणि मित्र परिवाराचे योगदान लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com