Lockdown : वयोवृद्धांसाठी 'निर्मल सेवा'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 April 2020

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. अशा या कठीण काळात या गरजूंना सध्या विविध सामाजिक संस्था, संघटनांनी मदतीचा हात दिला आहे. याच पार्श्वभूमीवर हडपसर येथील 'निर्मल सेवा फाउंडेशन'तर्फे एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात असून वयोवृध्द नागरिकांसाठी तो वरदान ठरत आहे.

पुणे - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. अशा या कठीण काळात या गरजूंना सध्या विविध सामाजिक संस्था, संघटनांनी मदतीचा हात दिला आहे. याच पार्श्वभूमीवर हडपसर येथील 'निर्मल सेवा फाउंडेशन'तर्फे एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात असून वयोवृध्द नागरिकांसाठी तो वरदान ठरत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात तीन मेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे सध्या छोट्या आजारांच्या तपासणीसाठी दवाखान्यात न जाऊ शकणाऱ्या वयोवृध्द नागरिकांची काळजी घेणे, त्यांना घरोपऔषधे उपलध करून देण्याचे कार्य फाऊंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे.

Corona Virus : काय  सांगता ?...पुण्यातील लॉकडाउन तीन मेनंतरही कायम?

आपल्या या उपक्रमा बाबत फाउंडेशनच्या संचालिका नलिनी धेंडे म्हणाल्या, "लॉकडाऊनच्या या कठीण काळात हडपसर भागातील शेकडो वयोवृध्द नागरिकांना घरपोच सेवा पुरविण्यात येत आहे. तसेच काही वृद्धांना मधुमेह असल्याने दररोज इंशुलीनचे इंजेक्शन द्यावे लागते. मात्र आता डॉक्टरकडे जाणे शक्य होत नसल्याने अश्या नागरिकांना घरी जाऊन इंजेक्शन देत आहोत. तसेच अथरूनावर खिळून असलेल्या वयोवृध्द नागरिकांना आंघोळ घालणे,  इजा असणाऱ्या वृद्धांची मलम पट्टी करणे अशी विविध सेवा करण्यात येत आहे. या वयोवृद्ध नागरिकांचा कुटुंबात त्यांच्या देखरेखीसाठी कोणी इतर सदस्य नसल्याने त्यांना मोठी अडचण येत आहे. त्यामुळे त्यांना घरपोच औषधे नेऊन देण्याचे काम फाउंडेशन तर्फे करण्यात येत आहे."

निर्मल सेवा फाऊंडेशन ही वयोवृद्ध नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवत आहे. सध्या संस्थेत 60 ते 95 वर्षांपर्यंतचे सुमारे वीस वयोवरुद्ध नागरिक आहेत. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. तसेच संस्थेतर्फे मास्क तयार करून परिसरातील गरजू नागरिकांना वाटण्यात आले आहे. काहींना रेशन सुद्धा पुरविण्यात आल्याचे धेंडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirmal Seva for Old People Motivation Initiative