esakal | ‘निसर्गाने दिला आनंदकंद’चे उद्या प्रकाशन
sakal

बोलून बातमी शोधा

Book

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी लिहिलेल्या ‘निसर्गाने दिला आनंदकंद’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी (ता. २१ जून)  नवी पेठ येथील पत्रकार भवनाच्या सभागृहात होणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ विजय केळकर यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार असून, या वेळी निसर्ग आणि जैववैविध्य या विषयांवरील विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे.

‘निसर्गाने दिला आनंदकंद’चे उद्या प्रकाशन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी लिहिलेल्या ‘निसर्गाने दिला आनंदकंद’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी (ता. २१ जून)  नवी पेठ येथील पत्रकार भवनाच्या सभागृहात होणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ विजय केळकर यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार असून, या वेळी निसर्ग आणि जैववैविध्य या विषयांवरील विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे.  

‘माणूस हा देखील परिसराचाच एक भाग आहे’ अशी जाणीव करून देणारे आणि परिसरशास्त्र विषयाचा पाया रचणाऱ्या गाडगीळ यांनी सर्वसामान्य वाचकांना निसर्गातील खजिन्याची ओळख करून देण्यासाठी सोप्या भाषेत आणि ललित शैलीत ‘निसर्गाने दिला आनंदकंद’ हे पुस्तक लिहिले आहे. ‘सकाळ’ प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचे हे संकलन आहे. 

या पुस्तकात उत्क्रांतीपासून ते सह्याद्रीतील देवराई, शाश्‍वत शेती, प्रदूषण, सौरऊर्जा, कीटकजगत, मेघनिर्मिती आणि पाऊस, औषधी वनस्पतीपर्यंत अनेक विषयांवर भाष्य केले आहे. 

३५० रुपये किमतीचे हे पुस्तक कार्यक्रमस्थळी, ‘सकाळ’चे मुख्य कार्यालय, सर्व आवृत्ती कार्यालये आणि प्रमुख विक्रेत्यांकडे सवलतीत उपलब्ध आहे.

ऑनलाइन खरेदीसाठी www.sakalpublications.com, amazon.in, bookganga.com वर लॉग इन करावे. अधिक माहितीसाठी सकाळ पुस्तक दालन, ५९५ , बुधवार पेठ, पुणे येथे अथवा ८८८८८४९०५० या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.