Yoga for Healthy Aging : उरुळी कांचन निसर्गोपचार आश्रमाचा ‘योगा फॉर हेल्दी एजिंग’ अभियान यशस्वी

उरुळी कांचन निसर्गोपचार आश्रमाच्या ‘योगा फॉर हेल्दी एजिंग’ अभियानातून १८ हजारांहून अधिक नागरिकांपर्यंत योगाचा जीवनशैली आधारित आरोग्यदृष्टिकोन पोहोचवित यशस्वी समारोप
Strategic Impact: Reaching 18,000+ Citizens through ‘Yoga for Healthy Aging’

Strategic Impact: Reaching 18,000+ Citizens through ‘Yoga for Healthy Aging’

Sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ निमित्त निसर्गोपचार आश्रम,उरुळी कांचन यांनी “योगा फॉर हेल्दी एजिंग” या आयुष मंत्रालयाच्या थीमनुसार महिनाभर व्यापक जनजागृती अभियान राबवले. जीवनशैलीजन्य आजार वाढत असताना योगाचा प्रतिबंधात्मक आणि जीवनशैली आधारित आरोग्यदृष्टिकोन समाजापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.योगाच्या प्रसारासाठी आश्रमाच्या कार्याची दखल घेत त्यांना आंतर-मंत्रालयीन बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले,जिथे राष्ट्रीय व जागतिक स्तरावर योगाचा प्रसार कसा करावा यावर मार्गदर्शन करण्यात आले.या अभियानांतर्गत एकूण १६ विविध योग व आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून,यामधून १८,००० हून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होताना, ताय ची,हस्त योग,कर्मचारी वर्गासाठी चेअर योग,आरएसबी समूहासाठी डेस्कटॉप योग,७ दिवसीय व्याख्यानमाला तसेच साउंड मेडिटेशन सत्रांचा समावेश होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com