
पुणे : ‘‘आपल्या सभोवताली अनेक उद्योजक विविध व्यवसाय करीत असतात, परंतु त्यापैकी काही उद्योजक आपल्याला प्रभावित करतात आणि स्मरणात राहतात. नितीन देसाई हे त्यापैकी असून दातृत्व, कर्तृत्व आणि दूरदृष्टी या त्रिसूत्रीमुळे त्यांनी यश संपादन केले आहे,’’ असे प्रतिपादन ‘सकाळ’ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले.