गडकरींची मोठी घोषणा; लवकरच लॉन्च करणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari
गडकरींची मोठी घोषणा; लवकरच लॉन्च करणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक!

गडकरींची मोठी घोषणा; लॉन्च करणार इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक!

पुणे : आपल्या बड्या घोषणांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज आणखी एक मोठी घोषणा केली आहे. लवकर आपण इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक लॉन्च करणार असल्याचं त्यांनी पुण्यात बोलताना म्हटलं आहे. पण त्यांच्या या घोषणेवरुन नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. आधी वीजेचा प्रश्न सोडवा मग अशा घोषणा करा असा सल्ला त्यांना अनेकांनी दिला आहे. (Nitin Gadkari big announcement Electric tractors and trucks to be launched soon)

गडकरी म्हणाले, इथेनॉल आणि मिथेनॉल या पर्यायी इंधनानंतर आता इलेक्ट्रिक वाहनं हे भविष्य असणार आहे. मला आठवतं तीन वर्षांपूर्वी मी जेव्हा ई व्हेईकल्स वापरासंबंधी बोललो होतो तेव्हा लोकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पण आता पाहा ई-व्हेईकल्सला मोठा प्रतिसाद मिळतो आहे, लोक इलेक्ट्रिक वाहनं घ्यायला वेटिंगला आहे. त्यामुळं आता इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक बसनंतर लवकरच मी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि इलेक्ट्रिक ट्रकही लॉन्च करणार आहे.

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

गडकरींच्या या घोषणेनंतर नेटकऱ्यांनी त्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्यानं त्यांनी विचारलं की उडणारी बस कधीपर्यंत येत आहे? महेश ढोबळे नामक नेटकऱ्यानं त्यांना सल्ला दिला की, आधी तुम्ही वीजेचा प्रश्न सोडवा मग अशा प्रकारच्या ईलेक्ट्रिक वाहनांच्या घोषणा करा. त्यापेक्षा सोलर न्यूक्लिअर पॉवरचा विचार करावा हाच सध्या बेस्ट ऑप्शन आहे. आशिष गुप्ता नामक व्यक्तीनं म्हटलं की, सोनालिका इंडिया या ट्रॅक्टर बनवणाऱ्या कंपनीनं आधीच इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची घोषणा केली आहे. कदाचित नितीन गडकरींना हे माहिती नाही. इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक भारतीय रस्त्यांवर यशस्वी ठरणार नाहीत, असं एजाज अहमद नामक व्यक्तीनं म्हटलं आहे.

Web Title: Nitin Gadkari Big Announcement Electric Tractors And Trucks To Be Launched Soon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top