
पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. सामान्य नागरिकांना या वाहतूक कोंडीचा नेहमीच त्रास होतो. दरम्यान, याचा फटका आता खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरींनाही बसला आहे. शनिवार वाडा ते स्वारगेट दरम्यान प्रस्तावित असलेल्या भुयारी मार्गाच्या पाहणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा आय़ोजित केला होता. मात्र वाहतूक कोंडीमुळे त्यांना पाहणीच्या ठिकाणापर्यंत पोहोचता आलं नाही. शेवटी गडकरींनी दौरा रद्द करून गाडीत बसूनच अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.