

Shirur Municipal Council Election Nitin Pacharne of BJP Wins Deputy Mayor Post Unopposed After NCP Withdrawal
esakal
शिरूर : शिरूर नगर परिषदेतील भारतीय जनता पक्षाचे गटनेते तथा नगरसेवक नितीन मच्छिंद्र पाचर्णे यांची आज अपेक्षेप्रमाणे उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच नगरसेवकांनी सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडण्याचा पवित्रा घेतल्यानंतर भाजपच्या ११ नगरसेवकांनी सत्ताधारी गटाला पाठिंबा दिला होता. त्याचवेळी पाचर्णे यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते.