सरकारी कार्यालयात 100 टक्के उपस्थिती नको

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती करु नये, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पुणे जिल्हा समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली. याबाबतचे निवेदन सोमवारी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

पुणे - कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती करु नये, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पुणे जिल्हा समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली. याबाबतचे निवेदन सोमवारी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महासंघाचे राज्य सरचिटणीस विनायक लहाडे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. जयश्री कटारे, सरचिटणीस विठ्ठल वाघमारे, विभागीय सहसचिव आर. टी. चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, माहिती अधिकारी वृषाली पाटील, शाखा अभियंता मनोहर खाडे, तहसीलदार विवेक जाधव आदी या वेळी उपस्थित होते. 

पुण्यात रेमडेसिव्हिरचा काळा बाजार 

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांची कार्यालयीन उपस्थिती शंभर टक्के करु नये. अधिकारी, कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा द्याव्यात, 50 लाख रुपयांचा विमा मंजूर करावा, संपूर्ण वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती द्यावी तसेच विलगीकरणासाठी स्वतंत्र रजा मंजूर करावी, या मागण्यांचा त्यात समावेश आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No 100 percent attendance in government office