
पुणे : बांधकामाच्या ठिकाणी हवा प्रदूषण करणाऱ्या ९१ बांधकाम प्रकल्पांना काम थांबविण्याचे आदेश देऊन दोन आठवडे झाले. त्यातील एकाही बांधकाम व्यावसायिकाने प्रदूषण कमी करण्यासाठी काय केले याचे उत्तर महापालिकेला दिले नाही अन् बांधकाम बंदीची नोटीस दिल्यापासून अधिकाऱ्यांनी एकाही कामाची उलट तपासणी केलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेचे आदेश अन कारवाई केवळ कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.