Pune Market Yard: बाजार समितीच्या चौकशीची घोषणाच; सदस्यांचा अद्याप पत्ता नाही, निविदा रद्द करण्याचा आदेशही नाही
Pune News: पणनमंत्री जयकुमार रावल यांनी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली होती. मात्र १५ दिवस उलटूनही समिती नेमली गेलेली नाही, तसेच चुकीच्या टेंडरबाबतही अधिकृत आदेश मिळालेले नाहीत.
मार्केट यार्ड : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत केली होती. मात्र या घोषणेला पंधरा दिवस उलटले, तरी अद्याप चौकशी समितीची नेमणूक झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.