
Pune Crime
esakal
पुणे : सराफाचे तब्बल दोन कोटी ८० लाख रुपयांचे हिरेजडित दागिने हडपल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कोलकता येथील सराफ व्यावसायिकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. या गुन्ह्याचा तपास प्राथमिक टप्प्यात असून, हडपलेले दागिने अद्याप हस्तगत करायचे आहेत; तसेच आरोपीचे दोन साथीदार व्यापारी अद्याप फरार आहेत, असे निरीक्षण नोंदवीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आलोक पांडे यांनी हा आदेश दिला.