अरे वा ! पुण्यातील 'या' सोसायटीमध्ये एकही कोरोना रूग्ण सापडला नाही...

समाधान काटे
Tuesday, 15 September 2020

रहिवासी काटेकोरपणे नियमांचे पालन करतायेत.

गोखलेनगर (पुणे) : आम्ही स्वत:ची काळजी स्वत: घेतो. घरकाम करणारे नोकर मास्क व सॅनिटायझर नियमाने वापरतात. घरातील कोणीही विनाकारण बाहेर जात नाही, असं दिव्या कुंज सोसायटीचे व्यवस्थापन समिती सदस्य मुकुंद शहा सांगत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गोखले रस्ता, तंत्रनिकेतन काॅलेजच्या शेजारी, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर येथे असलेली दिव्य कुंज सोसायटी व सेनापती बापट रस्ता, गोखलेनगर येथील कृषी सोसायटी या दोन सोसायट्यांमधील सध्याचे वातावरण काय आहे. या संदर्भात माहिती घेतली असता. येथील रहिवासी काटेकोरपणे नियमांचे पालन करतायेत अशी माहिती मिळाली. प्रत्येकजण स्वत:ची काळजी स्वत: घेत असून सॅनिटायझरचा वापर, मास्क वापरणे, विनाकारण बाहेर न येणे आदींचे पालन केले जाते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काढा करून पिणे, घरगुती उपाय करणे, बोलताना एकमेकांमध्ये सामाजिक अंतर ठेवणे. यासह इतर गोष्टींची काळजी घेताना दिसतात. दिव्य कुंज ही सोसायटी जवळपास ४५ वर्ष जुनी असल्याने या सोसायटीमध्ये राहणारे बहुतांश जेष्ठ नागरिक आहेत. हे जेष्ठ नागरिक टेरेसवर व्यायाम करुन आरोग्याची काळजी घेतात. घरामध्ये लागणारे साहित्य उदा. दूध, किराणा, भाजीपाला, पेपर, औषधं मुलं आणून देतात. नसेल तर आॅनलाईनचा पर्याय निवडला जातो. सोसायटीमध्ये कामाला येणाऱ्यांसाठी मास्क व सॅनिटायझर वापरणे सक्तीचे केले आहे. कृषी सोसायटीतही पुरेपूर काळजी घेतली जात असल्याने आजपर्यंत एकही रुग्ण सापडला नसल्याचे सांगण्यात आले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
       

"गोखलेनगर परिसरातील काही मुलं विना मास्क, विनाकारण सोसायटीच्या रस्त्यावर फिरताना दिसतात. त्याची आम्हाला भिती वाटते. सोसायटीकडे येणाऱ्या रस्त्यावर पूर्वी पत्रे होते. ते आता काढल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
- सतीश सांडभोर, चेअरमन, कृषी सोसायटी, गोखलेनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No corona patient was found in the krushi society in Pune