लोहगाव भागातील रस्ते अंधारात; बंद पथदिव्यांमुळे गैरसोय

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

प्रभाग क्रमांक तीन व नव्याने समावेश झालेल्या प्रभाग क्रमांक ४२ मध्ये नव्याने विद्युत खांब बसविण्यासाठी व लाईट लावण्यासाठी नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने लाखो रुपयांचा खर्च करण्यात आले त्याच बरोबर देखभाल दुरुस्तीसाठी देखील ठेकेदार नेमलेले आहेत, मात्र प्रत्यक्षात मात्र लोहगाव भागातील पथ दिवे बंद अवस्थेत आहेत. न

रामवाडी(पुणे) : ''लोहगाव-वाघोली रस्ता, योजना नगर, संतनगर, पाटील वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. रात्रीच्या वेळी परिसरात अंधार असतो. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने या भागातील पथदिवे सुरू करावेत,'' अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रभाग क्रमांक तीन व नव्याने समावेश झालेल्या प्रभाग क्रमांक ४२ मध्ये नव्याने विद्युत खांब बसविण्यासाठी व लाईट लावण्यासाठी नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने लाखो रुपयांचा खर्च करण्यात आले त्याच बरोबर देखभाल दुरुस्तीसाठी देखील ठेकेदार नेमलेले आहेत, मात्र प्रत्यक्षात मात्र लोहगाव भागातील पथ दिवे बंद अवस्थेत आहेत. नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाकडील विद्युत विभागाकडील एकही कर्मचारी रात्रीच्या वेळी पथ दिवे सुरू आहेत की बंद आहेत हे पाहण्यासाठी फिरकत नाहीत. त्यामूळे गेल्या अनेक दिवसांपासून पथ दिवे बंदच आहेत. अंधारातच पादचा-यांना ये-जा करावी लागत आहे. अपघात व लूटमारीचे प्रकार वाढले आहेत. तातडीने नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने नादुरुस्त झालेले पथदिवे दुरुस्त करावेत अशी मागणी नागरिकां कडून केली जात  आहे. 

गौतम पाषाणकर प्रकरणाला वेगळे वळण; बेपत्ता होण्यामागे बड्या राजकीय व्यक्तीचा हात?

''रात्रीच्या वेळेस सदर ठिकाणी अंधाराचा फायदा घेऊन एखाद्या व्यक्तीला लुबाडण्याची शक्यता जास्त आहे. प्रशासनाने लहान मुली व महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने पथदिवे लवकरात लवकर सुरु करावे.''   
- सचिन सातव, स्थानिक रहिवासी

''लोहगाव भागात ज्या ठिकाणी पथदिवे बंद आहे, त्या ठिकाणची पाहणी करून पथदिवे  लवकरात लवकर सुरू केले जातील.''
-  रोहन मुतूगें विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No electricity in Lohegaon for the last several days