
भीमा-कोरेगाव येथे दंगल झाल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात पोलिस तपासात कोणताही पुरावा आढळलेला नाही.
भीमा-कोरेगाव दंगल झाल्याप्रकरणी भिडे यांच्या विरोधात कुठलाही पुरावा सापडला नाही
पुणे - भीमा-कोरेगाव येथे दंगल (Bhima-Koregaon Riot) झाल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात (Crime) शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या विरोधात पोलिस तपासात (Police Inquiry) कोणताही पुरावा (Proof) आढळलेला नाही. त्यामुळे त्याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्य मानवी आयोगाला याबाबतची माहिती दिली.
या प्रकरणात चाळीसहून अधिक जणांवर गुन्हे असून, काही महिन्यांपूर्वी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास केला. यामध्ये संभाजी भिडे यांच्याविरोधात कोणताही पुरावा मिळून आला नाही. त्यामुळे त्यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आलेला नाही. इतर आरोपींच्या विरोधात शिवाजीनगर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे, असे भिडे यांचे वकील ऍड. पुष्कर दुर्गे यांनी सांगितले.
याबाबत दाखल गुन्ह्यात नमुद आरोपी यात्रा सदर गुन्हयामध्ये सहभाग असणे अगर कट रचने बाबत बारकाईने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष साक्षीदार तपासण्यात आले आहेत. तसेच पुरावे मिळण्याचे दृष्टीने बारकाईने तपास करूनही भिडे यांच्या विरुद्ध कोणताही ठोस पुरावा किंवा गुन्ह्यात सहभागाबाबत साक्षिदार मिळुन येत नाही. तसेच गुन्हा घडला त्यावेळी आरोपी हा सांगली जिल्ह्यात उपस्थित असल्याबाबत साक्षिदार सांगत आहेत. त्यामुळे तपासाअंती भिडे यांच्याविरुद्ध दोषारोप ठेवता आला नाही, असे पोलिसांनी सादर केलेल्या माहितीत नमूद आहे.
या प्रकरणात काही महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या दोषारोपपत्रात भिडे यांच्या विरोधात कुठलाही पुरावा सापडला नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख आरोपी म्हणून दोषारोप पत्रात करण्यात आलेला नाही
- ऍड. पुष्कर दुर्गे, भिडे यांचे वकील