
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोन सदस्य निलंबित झाल्यापासून, पुणे बाल न्याय मंडळात (जुव्हेनाईल जस्टिस बोर्ड - जेजेबी) अद्यापही पूर्णवेळ सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. सध्या केवळ अतिरिक्त कार्यभार दिलेल्या सदस्यांमार्फत आठवड्यातील काही ठरावीक दिवस सुनावणी होत आहेत. त्यामुळे पाच हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित असून, त्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.