

Chandrashekhar Bawankule
sakal
पुणे - ‘स्थानिक पातळीवर आघाडी करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने कुणाबरोबर आघाडी करावी, हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय आहे. निवडणुकीसाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर आघाडी केली म्हणजे महायुती म्हणून त्या पक्षाला राज्यातील सत्तेतील वाटेकरी होता येणार नाही. या प्रयोगाचा राज्यातील सत्तेवर कसलाही परिणाम होणार नाही,’ अशी स्पष्ट भूमिका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी मांडली.