Pune Crime : कोणी कितीही ताकद लावा, गुन्हा दाखल करणार म्हणजे करणार; पोलिस निरीक्षक शेडगे यांचा इशारा

दौंड तालुक्यातील वरवंड-पाटस यात्रा उत्सव निर्विघ्न व शांततेत पार पडण्यासाठी यवत पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे
no matter what will happend i will file case says police Inspector hemant shedge
no matter what will happend i will file case says police Inspector hemant shedge Sakal
Updated on

वरवंड : दौंड तालुक्यातील वरवंड-पाटस यात्रा उत्सव निर्विघ्न व शांततेत पार पडण्यासाठी यवत पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. पोलिस टाइमपास करायला येणार नाही. यात्रेत उपद्रव,विघातक कृत्य करण्यांची गय करणार नाही कोणी कितीही ताकद लावा कायदा मोडला की मी गुन्हा दाखल करणार म्हणजे करणारच असा इशारा पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिला.

तालुक्यातील वरवंड पाटस गावांचा यात्रा उत्सवास आज पासून सुरवात होत आहे.दरवर्षी लाखो भावीक दर्शनासाठी येतात.यंदाही दोन्ही गावच्या यात्रा कमिटीच्या वतीने धार्मीक व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

मात्र,यात्रेमध्ये काही टवाळखोरांकडुन उपद्रव केला जातो.वरवंड व पाटस यात्रेत भांडणाचे प्रकार घडले आहेत.या पाश्वभुमीवर यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी टवाळखोरांच्या विरुध्दात भुमिका स्पष्ट केली.

वरवंड व पाटस येथे यात्रा उत्सव नियोजनाची बैठक घेण्यात आली. त्यावेळी गावातील सरपंच,उपसरपंच यांच्या सह यात्रा कमिटी पदाधिकारी व प्रमुख ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी पोलिस निरीक्षक शेडगे म्हणाले,यात्रेत मोठया प्रमाणात गर्दी असते. चोरीचे प्रकार घडतात. महीलांनी मोल्यवान दागीन्यांवर लक्ष ठेवा.

लहान मुलांवर लक्ष ठेवा. मंदीरात दर्शनाला जाताना घरात एखादा व्यक्ती थांबा,पाळणे,तमाशा तसेच कुस्त्यांच्या आखाड्या दरम्यान भांडणाचे प्रकार घडणार नाही याची काळजी घ्य़ा. आवश्यक ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

शिवाय साध्या वेशात पोलिस फिरणार आहेत. यात्रेत गोंधळ,छेडछाड आदी अनुचित प्रकार करणाऱयांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या जाणार आहेत. यात्रेत तुम्ही मजा व उपद्रव करणार आणी पोलिस बघ्याची भुमिका घेणार हे कधीच होणार नाही.

कायदा मोडला की सोडणार नाही. कोणी कितीही ताकद लावली किंबहुना कोणी कोणास पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तरी कारवाइ करणार म्हणजे करणारच आहे. टवाळखोरांना सळोकी पळोकी करुन सोडणार हे नक्की. असा इशारा शेडगे यांनी दिला. तसेच त्यांनी वाहतुक कोंडी,यात्रेत वाहतुकीतील बदल याविषयी ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी अनेकांनी मते मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MPSC Exam Case Police Inspector Rahul Shire Faces Departmental Inquiry After Incorrect Information Found in Investigation Report
A New Hope for Life 50 Children in Conflict with Law Leave Crime
MPSC Drug Inspector re-exam 2026 latest update
MPSC Drug Inspector re-exam 2026 latest update
Marathi News Esakal
www.esakal.com