पुणे - ‘पुण्यात शिवसेना १२० जागा लढवत आहे. त्यापैकी दखल घेतली जाईल एवढे नगरसेवक निवडून येतील. शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय पुण्याचा महापौर होणार नाही,’ असा विश्वास शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. .सामंत यांनी पुण्यात शनिवारी शिवसेनेचा प्रचाराचा नारळ फोडला, त्यावेळी ते बोलत होते. भाजपबरोबरची युती तुटली नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. युती तुटली नाही असे म्हणता; तर शिवसेनेला १२० पेक्षा जास्त जागांवर कसे उभे राहावे लागले, भाजपने सन्मानपूर्वक जागा का दिल्या नाहीत? यावर सामंत म्हणाले, ‘‘युती तुटली असे मी आजही समजत नाही..आम्ही १२० ठिकाणी भाजपबरोबर मैत्रीपूर्ण लढत देत आहोत. काही ठिकाणी एक ते चार ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते. पुण्याच्या इतिहासात असे पहिल्यांदा असेल, की १६५ पैकी १२० ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहे. इतक्या जागा देता येणार नाही, असे भाजपने नम्रतापूर्वक सांगितले; ते आम्ही स्वीकारले. आम्ही सेफ गेम खेळत नसून आम्ही संयमी आहोत.’’.बिनविरोध जागांसाठी संजय राऊत यांनी पाच कोटी रुपये वाटल्याच्या आरोपावर सामंत म्हणाले, ‘‘हा चुकीचा नॅरेटिव्ह सेट केला जात आहे. अजित पवार यांनी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला का तिकीट दिले? त्याबाबत ते सांगू शकतात. परंतु, शिवसेनेने असे केलेले नाही.’’ डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, "लाडकी बहीण योजनेवर विरोधकांचा अपप्रचार जनतेने फेटाळला आहे. निवडणुकीत जनता पुन्हा शिवसेनेला साथ देईल. प्रचारात सकारात्मक राहावे, विरोधकांवर टीका टाळावी. शिंदे यांची पूर्ण ताकद उमेदवारांपाठीशी आहे.'.‘जोमाने प्रचार करा’शिवसैनिक संघर्षातून निर्माण झालेला आहे. वाहतुकीचा प्रश्न, नवले पुलाची समस्या, कात्रजचा विकास आराखडा, नवीन गावांचा विकास केवळ शिंदे करू शकतात, हे पुणेकरांना सांगा. आजपासून घराघरांत प्रचाराला सुरुवात करा, असे आवाहन सामंत यांनी उमेदवारांना केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.