Maharashtra Police
sakal
पुणे - गुन्हा घडल्यानंतर ‘आमच्या हद्दीत घटना घडलेली नाही, संबंधित पोलिस ठाण्यात जा’ असा सल्ला देत पीडितांची अडवणूक करण्याचे प्रमाण ताज्या घटनांवरून कमी झाल्याचे दिसून येत आहे. भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) नवीन तरतुदींनुसार, आता कोणत्याही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणे बंधनकारक करणारी ‘झिरो एफआयआर’ ही कायदेशीर तरतूद सध्या तक्रारदारांसाठी महत्त्वाची ठरत आहे.