MPSC 2025
sakal
पुणे
MPSC 2025: खुल्या प्रवर्गाने परीक्षा द्यायची नाही का? ‘राज्य कर निरीक्षक’ पदासाठी शून्य जागा; विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी
STI Recruitment: एमपीएससी ‘गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२५’च्या जाहिरातीत राज्य कर निरीक्षक पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी एकही जागा नाही. या निर्णयावर विद्यार्थ्यांत तीव्र नाराजी उसळली असून, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी अन्यायाचा प्रश्न उपस्थित केला आहे.
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ‘महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२५’ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. मात्र, त्यात राज्य कर निरीक्षक (एसटीआय) पदासाठी तब्बल २७० हून अधिक जागा असून खुल्या प्रवर्गासाठी एकही जागा नाही. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ‘खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायचीच नाही का?’ असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

