
प्रज्वल रामटेके
पुणे : राज्य सरकारच्या अधीनस्त असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) आणि महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या संस्थांची पीएच.डी. अधिछात्रवृत्तीची जाहिरात दोन वर्षे प्रसिद्ध झालेली नाही. परिणामी संशोधनासाठी प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.