
लोकमान्य टिळकांच्या नावावर राजकारण नको - कुणाल टिळक
पुणे - ‘लोकमान्य टिळकांच्या नावावर कोणीच राजकारण करू नये. त्यांच्या कार्याचे पुरावे आहेत, कोणाला त्यांच्या कार्याची पावती देण्याची गरज नाही. तसेच, दोन समाजात तेढ निर्माण करण्याची गरज नाही,’ असे स्पष्ट मत लोकमान्य टिळकांचे वंशज खापर पणतू कुणाल टिळक यांनी केले आहे.
औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत टिळकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी पैसा गोळा केला तो कोठे गेला, असा प्रश्न उपस्थित केला.
या संदर्भात कुणाल टिळक म्हणाले, ‘‘राज ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्याची किंवा समाजात तेढ निर्माण करण्याची गरज नाही, असे मला वाटते. टिळकांच्या हयातीत समाधी झाली नाही. परंतु टिळकांनी शिवाजी महाराजांची समाधी उभारण्यासाठी भरपूर काम केले आहे. त्याचे पुरावेही उपलब्ध आहेत. १८९५ मध्ये रायगडावर टिळकांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यसेनानी आणि क्रांतिकारकांच्या नावावर कोणीही राजकारण करण्याची गरज नाही.’
Web Title: No Politics In The Name Of Lokmanya Tilak Kunal Tilak
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..