esakal | चिकन बिनधास्त खा, कोरोनाशी संबंध नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

Chicken

राज्यातील चित्र
- दररोज होणारी चिकनची सरासरी विक्री - २५०० ते २८०० टन 
- कोरोनाच्या अफवांमुळे चिकनची सध्याची विक्री - २२०० टन
- दरदिवशी कमी झालेली चिकनची विक्री - ३०० टन
 -दररोज विक्री होणाऱ्या अंड्यांची संख्या - ३ कोटी
- कोंबड्यांची संख्या - ७ कोटी ४२ लाख

चिकन बिनधास्त खा, कोरोनाशी संबंध नाही!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - चिकनमधून कोरोनाचे संक्रमण मानवात होत नाही. त्यामुळे चिकन आहारासाठी पूर्णतः सुरक्षित असून, चिकनमधून कोरोना विषाणूंचा संसर्ग होत असल्याच्या अफवांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी पत्रकार परिषदेत केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूंचा संसर्ग चिकनमधून होत असल्याचा सर्वाधिक फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला आहे. मात्र, चिकनपासून कोरोनाचा प्रसार होत नसल्याची शास्त्रीय माहिती देण्यासाठी पशुसंवर्धन विभाग आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्‍टरांनी दिली, त्या वेळी ते बोलत होते. महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, उपअधीक्षक डॉ. विजय जाधव, डॉ. विनायक लिमये, बालरोगतज्ज्ञ डॉ. आरती किणीकर, डॉ. सोमनाथ सलगर उपस्थित होते.
कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे होणारा आजार आपल्या देशातही चिकनमधून होतो, अशा आशयाच्या चुकीच्या पोस्ट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचा थेट परिणाम चिकनच्या खपावर झाला आहे. दररोज होणाऱ्या विक्रीच्या तुलनेत चिकनचा खप ३०० टनांनी कमी झाला, असेही डॉ. परकाळे यांनी सांगितले.

पुणे विमानतळावर अपघात होता होता वाचला; वाचा काय घडले!

कुक्‍कुटपालन व्यवसायाशी राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा चरितार्थ आहे. मका व सोयाबीन उत्पादक विशेषतः कुक्कुटपालन उद्योगाशी संबंधित आहेत. हा व्यवसाय राज्याच्या विकासाशी जोडलेला आहे. कुक्कुट पक्षी व मांस यांचा कोरोनाच्या प्रादुर्भावाशी कोणताही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

loading image