प्रश्‍नपत्रिका कशी मिळवली याबाबत आरोपींकडून समाधान उत्तर नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paper
प्रश्‍नपत्रिका कशी मिळवली याबाबत आरोपींकडून समाधान उत्तर नाही

प्रश्‍नपत्रिका कशी मिळवली याबाबत आरोपींकडून समाधान उत्तर नाही

पुणे : आरोग्य विभाग गट क संवर्गातील पदाच्या निवडीच्या लेखी परिक्षेची प्रश्‍नपत्रिका कशी मिळवली? या गुन्ह्यात इतर साथीदार कोण आहेत ? याबाबत अटक आरोपी समाधानकारक माहिती देत नसल्याची माहिती सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी मंगळवारी (ता. ४) न्यायालयास दिली.(health department exam crime)

हेही वाचा: पोलिस आयुक्ताच्या टेलिग्रामवर पाठविल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रिका

या गुन्ह्यात निशीद रामहरी गायकवाड (वय ४३, रा. नागपूर), राहुल धनराज लिंघोट (रा. अमरावती) आणि आशुतोष वेदप्रिय शर्मा (वय ३८, रा. दिल्ली) यांना अटक करण्यात आली आहे. यातील शर्मा याला न्यायालयाने चार जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. तर गायकवाड आणि लिंघोट यांची सहा जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी रवानगी करण्यात आली आहे. शर्मा हा एजंट असून त्याची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींनी गुन्ह्याचा कट आणि त्याची कार्यपद्धती तपासादरम्यान पोलिसांना सांगितली आहे.(Pune news)

हेही वाचा: पुणे : महापालिका सेवकांना 'घरभाड्यात' दिलासा

अटक आरोपींनी पाहिजे असलेल्या आरोपींच्या मदतीने परिक्षेपुर्वी काही दिवस आधी कट रचून प्रश्‍नपत्रिका फोडल्यानंतर ती उमेदवारांना देवून त्यांच्याकडून काही रक्कम घेतली आहे. मात्र आरोपींनी प्रश्‍नपत्रिका कशी मिळवली. त्यात इतर कोण साथीदार आहेत, याबाबत आरोपी समाधानकारक उत्तर देत नाहीत, असा युक्तिवाद ॲड. जाधव यांनी केला. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी शर्मा याच्या पोलिस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्याची मागणी ॲड. जाधव यांनी केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी शर्मा याच्या पोलिस कोठडीत १० जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयंत राजूरकर करीत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top