अतिंम वर्षाच्या परीक्षेसाठी प्रश्नसंच नाही पण...; पुणे विद्यापिठाने काढला तोडगा!

ब्रिजमोहन पाटील
Monday, 21 September 2020

पुणे विद्यापीठाने एका तासाची आणि 50 गुणांची परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे केले आहे. त्यासाठी विषय निहाय 'एमसीक्यू' प्रश्नसंच तयार काढण्यासाठी समिती नेमली आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रत्येक विषयाची क्वेशन(प्रश्न) बँक तयार होणार आहे. त्यापैकी परीक्षेमध्ये साठ प्रश्न विचारले जाणार आहेत. ​

पुणे : अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी प्रश्न संच उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली असली तरी त्यांना प्रश्नसंच मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याऐवजी नमुना प्रश्नांद्वारे त्यांची सराव परीक्षा घेतली जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऑक्टोबर महिन्यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल च्वाईस क्वेश्चन-एमसीक्यू) पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत दिलेल्या परीक्षा व त्यासाठी केलेली तयारी ही दिर्घोत्तरी प्रश्नांसाठी केलेली आहे. आता अचानक 'एमसीक्यू' पद्धतीने प्रश्न विचारला जाणार जाणार असल्याने विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. आम्हाला या पद्धतीने परीक्षेचा अभ्यास करून माहिती नाही. त्यामुळे प्रश्न संच उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राज्यभरातील विद्यार्थी राज्य सरकार व संबंधित विद्यापीठांकडे करत आहेत आहेत. 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 10 सप्टेंबर रोजी ट्विट करत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना परीक्षेच्या दोन दिवस आधी विद्यार्थ्यांना प्रश्न संच उपलब्ध करून द्यावा अशा सूचना दिल्याचे सांगितले होते. त्यामुळे पुणे विद्यापीठ ही प्रश्नसंच कधी देणार अशी विचारणा विद्यार्थी करत आहेत.

पुणे विद्यापीठाने एका तासाची आणि 50 गुणांची परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे केले आहे. त्यासाठी विषय निहाय 'एमसीक्यू' प्रश्नसंच तयार काढण्यासाठी समिती नेमली आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रत्येक विषयाची क्वेशन(प्रश्न) बँक तयार होणार आहे. त्यापैकी परीक्षेमध्ये साठ प्रश्न विचारले जाणार आहेत. 

 आरोग्य सुविधांचे ‘ऑपरेशन’ गरजेचे! 
 

पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ . एन. एस. 
उमराणी म्हणाले, "विद्यार्थ्यांना परीक्षेचा पॅटर्न कळावा यासाठी दोन वेळा नमुना प्रश्नांद्वारे सराव परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये अशाच पद्धतीने परीक्षा घेण्याचे ठरले आहे."

परीक्षेचा वेळ वाढविण्यात यावा 
युवक क्रांती दलाने परीक्षेसंदर्भात कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांना निवेदन दिले. त्यामध्ये प्रश्नसंच उपलब्ध करून देणे, परीक्षेची वेळ एक तासा ऐवजी दीड तास करावा, परीक्षा एमसीक्यू व असाइनमेंट बेस या दोन्ही पद्धतीने घ्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी पवार यांनी' परीक्षेच्या पूर्वी दोन ते तीन सराव परीक्षा होतील, त्यामध्ये नमुना प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे प्रश्न कसे असणार आहे आणि प्रॉक्टर्ड संदर्भातील जे संभ्रम निर्माण झाले आहेत याबाबत पूर्णपणे स्पष्टता येईल. तसेच परीक्षेची वेळ वाढविण्याबाबत कुलगुरूंशी चर्चा करून असे पवार यांनी आश्वासन दिले. यावेळी युवक क्रांती दलाचे राज्य संघटक जांबुवंत मनोहर, सहकार्यवाह अप्पा अनारसे, शहराध्यक्ष सचिन पांडूळे, उपाध्यक्ष कमलाकर शेटे उपस्थित होते.

'पुण्यात 20 IAS अधिकारी तरी उपयोग होईना आता...'; कोरोना रोखण्यासाठी गिरीष बापट यांचा सल्ला​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no set of questions for the final year examination but practice test will be taken through sample questions