Independence Day : शाळेत ध्वजारोहण करायचे की नाही?

संतोष शाळिग्राम
Tuesday, 11 August 2020

कोरोनामुळे हा दिवस कसा साजरा करावा, याबद्दल राज्य सरकारने सूचना जारी केल्या; पण शाळांमध्ये या दिवशी ध्वजारोहण करायचे की नाही, असा संभ्रम मुख्याध्यापकांमध्ये आहे. कोरोनामुळे या दिवशी विद्यार्थ्यांना तर शाळेत बोलावता येणार नाही. पण दरवर्षी होणारे ध्वजारोहण करायचे की नाही? करायचे असल्यास त्यास कुणी उपस्थित‌‌ राहायचे‌ याबद्दल तातडीने जिल्हाधिकारी स्तरावरून सूचना जारी कराव्यात‌, अशी मागणी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाने केली आहे.

पुणे : देशाचा 73 वा स्वातंत्र्य दिन काही दिवसांवर आला आहे. हा दिवस म्हणजे शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ध्वजारोहन असा असतो. यंदा कोरोनामुळे शाळा बंद आहेत. तेथे ध्वजारोहण करायचे की नाही, याबद्दल कोणत्याच सूचना राज्य सरकारने दिलेल्या नाहीत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे हा दिवस कसा साजरा करावा, याबद्दल राज्य सरकारने सूचना जारी केल्या; पण शाळांमध्ये या दिवशी ध्वजारोहण करायचे की नाही, असा संभ्रम मुख्याध्यापकांमध्ये आहे. कोरोनामुळे या दिवशी विद्यार्थ्यांना तर शाळेत बोलावता येणार नाही. पण दरवर्षी होणारे ध्वजारोहण करायचे की नाही? करायचे असल्यास त्यास कुणी उपस्थित‌‌ राहायचे‌ याबद्दल तातडीने जिल्हाधिकारी स्तरावरून सूचना जारी कराव्यात‌, अशी मागणी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाने केली आहे. शासकीय स्तरावर ध्वजारोहण कुठे आणि कुणी करायचे‌‌ याच्या‌ सविस्तर सूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी केल्या आहेत. परंतु शाळांना त्यात कोणत्याही सूचना नसल्याने शिक्षक, मुख्याध्यापकांमध्ये संभ्रम असल्याचे या संघटनेचे पदाधिकारी महेंद्र गणपुले म्हणाले.

बारामतीकरांनो सावधान, आता कोरोनाच्या समूह संसर्गाचा धोका 
 

सरकारच्या आदेशानुसार सर्व विभागीय, जिल्हा, उपविभागीय आणि तालुका मुख्यालयात या दिवशी ध्वजारोहण करा‌यचे आहे. शासकीय, सार्वजनिक इमारती आणि ऐतिहासिक महत्त्वांच्या किल्ल्यांवर ध्वजारोहण होईल. मुंबईमध्ये मुख्यमंत्री, तर पुण्यात‌ राज्यपालांच्या‌ हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे. या दिवशी वृक्षारोपन यांसह विविध कार्यक्रम घेतल्यास‌ त्यासाठी कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करावयाचे आहे. प्रत्येकाे मास्क लावणे बंधनकारक आहे.

राज्यभर ध्वजारोहणाचा‌ शासकीय कार्यक्रम हा नऊ वाजून पाच मिनिटांनी होईल. या दिवशी आत्मनिर्भर भारत‌ या घोषणेेचा प्रसार करण्याच्या सूचना देखील देण्यात‌ आल्या आहेत. याशिवाय पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक आणि अमरावती येथील विभागीय आयुक्त हे ध्वजारोहणाची व्यवस्था करणार आहेत. त्यामुळे तेथील जिल्हाधिकारी कार्यालयाने वेगळे कार्यक्रम करण्याची‌ आवश्यकता नाही, असेही सूचित करण्यात आले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No suggestions yet about Flag hoisting at school on Independence Day