esakal | पुणे : पर्यटनस्थळी गर्दी नको, प्रतिबंधात्मक आदेश लागू
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Rajesh Deshmukh

पुणे : पर्यटनस्थळी गर्दी नको, प्रतिबंधात्मक आदेश लागू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) रोखण्यासाठी जिल्ह्यातील पर्यटनस्थळी (Tourism Place) प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. पर्यटनस्थळांवरील धबधबे, धरणांच्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr Rajesh Deshmukh) यांनी आदेशात नमूद केले आहे. (No Tourist Crowds Preventive Orders Apply)

जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर आणि वेल्हा तालुक्यांतील पर्यटनस्थळे आणि धरणांच्या परिसरात पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या एक किलोमीटर परिसरात पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील. तसेच, दुचाकीसह सर्व वाहनांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. पुढील निर्णय होईपर्यंत हे आदेश लागू राहतील. दरम्यान, हॉटेल आणि रिसॉर्टवर नागरिकांना राहता येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा: 'आयसर'मधील आग अडीच तासांत आटोक्यात; जीवितहानी नाही

प्रतिबंधात्मक क्षेत्र :

मावळ तालुका : भुशी डॅम, लोणावळा डॅम, तुंगार्ली डॅम, राजमाची पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वळवण डॅम, एकवीरा मंदिर परिसर, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड, तुंग, विसापूर, तिकोना किल्ला, पवना धरण परिसर, भाजे धबधबा, आंबेगाव येथील धबधबा, दुधीवरे येथील प्रति पंढरपूर मंदिर, बेंदेवाडी, दाहुली,

मुळशी तालुका : लवासा, टेमघर धरण परिसर, मुळशी धरण परिसर, पळशे धबधबा, पिंपरी दरी पॉइंट, सहारा सिटी, काळवण परिसर, ताम्हिणी घाट परिसर.

हवेली तालुका : घेरा सिंहगड, सिंहगड किल्ला, डोणजे, खडकवासला धरण परिसर

आंबेगाव तालुका : भिमाशंकर मंदिर परिसर, कोंडवळ धबधबा, डिंभे धरण, आहुपे

जुन्नर तालुका : नाणेघाट, दारे घाट, आंबे हातवीज, वडज , माणिकडोह धरण, शिवनेरी, सावंड, हडसर किल्ला, बिबटा निवारा केंद्र.

भोर तालुका : वरंधा घाट, रोहडेश्वर गड, रायरेश्वर किल्ला, भाटघर, नीरा देवघर धरण, नागेश्वर मंदिर, आंबवडे, भोर राजवाडा, नारायणपूर मंदिर परिसर, पानवडी घाट, बोपदेव घाट, दिवेघाट, मल्हारगड.

वेल्हा तालुका : तोरणा, राजगड किल्ला, मढे घाट, पानशेत धरण, वरसगाव धरण परिसर.

हा आदेश शनिवार-रविवारसह सर्व दिवसांसाठी लागू आहे. हॉटेल, रिसॉर्टवर राहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांशी या आदेशाचा संबंध नाही. पर्यटन व्यावसायिकांनी कोरोनाबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात. पावसाळी पर्यटनाची ठिकाणे वगळता नागरिकांना पुढे जायचे असल्यास त्यांनी पोलिसांना तसे सांगावे. त्यांची कोठेही अडवणूक होणार नाही.

- अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण

loading image