पुणे : शहराच्या 'या' भागातील पाणीपुरवठा उद्या बंद राहणार!

Water-Supply
Water-Supply

पुणे : शहरातील विविध जलकेंद्रांमधील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली असून, त्यातर्गंत पद्मावती पंपिंग स्टेशनमधील अत्यावश्‍यक कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे या केंद्रातून शुक्रवारी (ता.15) सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत पाणीपुरवठा होणार नाही.

त्यामुळे पद्मावती, संभाजीनगर, चव्हाणनगर, शंकर महाराज वसातीसह तळजाई, तळजाई वसाहत आणि परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गुरुवारी कळविले आहे. जलकेंद्रांतील देखभाल-दुरुस्तीची कामे वेगाने करण्यात येणार आहेत. त्यामुळे या भागांतील रहिवाशांच्या सोयीसाठी दुपारी तीन वाजेनंतर मात्र, नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पुरेसे पाणी मिळेल, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. 

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने सर्व जलकेंद्रांमधील देखभाल-दुरुस्ती सुरू केली आहे. मात्र, पद्मावमती केंद्रातील काही कामे तातडीने करण्याची गरज असल्याने ती शुक्रवार सकाळपासूनच हाती घेण्यात येणार आहेत. जलकेंद्रातील मुख्य जलवाहिनी, अतंर्गंत वाहिना, फिल्टर, व्हॉल्वही पाहणी करून आवश्‍यक ती दुरुस्ती केली जाणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अक्षीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी सांगितले. 

सध्या लॉकडाउनमुळे नागरिक घराबाहेर येत नाहीत. त्यातच वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत आहे. त्यामुळे या काळात पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेचे आहे. या बाबींचा विचार करून पद्मावती पंपिंग स्टेशनमधील कामे वेळेत करून त्या-त्या भागांतील रहिवाशांना दुपारनंतर सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे ही कामे संपून पाणीपुरवठा करेपर्यंत रहिवाशांनी सहकार्य करावे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

दरम्यान, पाणीपुरवठा विभागातर्गंतची सर्व कामे सुरू आहेत. पावसाळ्याआधी खोदाईची कामे संपविण्यात येणार आहेत. त्यामुळे लॉकडाउन असतानाही जलकेंद्र, जलवाहिन्यांची कामे सुरूच होती, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.

- पुण्याच्या बातम्यांसाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com