esakal | शाळाविना असलेल्या शिक्षकांना समुपदेशनाने देणार नियुक्त्या
sakal

बोलून बातमी शोधा

teacher

शाळाविना असलेल्या शिक्षकांना समुपदेशनाने देणार नियुक्त्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सध्या शाळा किंवा नियुक्तीविना असलेल्या प्राथमिक शिक्षकांना समुपदेशनाद्वारे नियुक्त्या देण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. यासाठी रिक्त पदांची यादी तयार करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी प्राथमिक शिक्षण विभागाला दिला आहे. या यादीतील सेवाज्येष्ठतेनुसार या शिक्षकांना नवीन शाळांवर नियुक्त्या दिल्या जाणार आहेत.

सद्यःस्थितीत जिल्हा परिषद शाळांमधील दिव्यांग, मुख्याध्यापक पदावरून पदावन्नत झालेले, अनुसूचित जमाती संवर्ग आणि महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील जिल्हा परिषद शाळांवरील शिक्षक हे नवीन नियुक्तीविना आहेत. या गटातील सर्व शिक्षकांची नवीन शाळेवर नियुक्ती केली जाणार आहे. या नियुक्तीसाठी समुपदेशन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे.

हेही वाचा: अखेर मनोहरमामाला बारामती पोलिसांनी साताऱ्यात पकडले

या सर्व संवर्गातील शिक्षकांच्या नियुक्त्या या एकाचवेळी केल्या जाणार आहेत. त्यामुळे संवर्गनिहाय सेवाज्येष्ठता याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या शिक्षकांना नवीन शाळेवर नियुक्ती देण्यासाठी रिक्त असलेल्या जागांची माहिती जमा केली जाणार आहे. या शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार क्रमाक्रमाने रिक्त जागांची यादी गाव व शाळेच्या नावासह दाखविली जाणार आहे. या यादीतील कोणतीही शाळा निवडण्याचे स्वातंत्र्य या शिक्षकांना असणार आहे. त्यामुळे हे शिक्षक आपापल्या पसंतीनुसार नवीन शाळा निवडू शकणार आहेत.

loading image
go to top