गॅस सिलेंडर महागले; सामान्यांच्या खिशाला कात्री

Untitled-6.gif
Untitled-6.gif

मंचर  : नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच घरगुती गॅस सिलिंडरwच्या दरात १४६ रुपयांची, तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात २२६ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार (ता. १२) पासून दरवाढ लागू झाल्याने नागरिकांना दरवाढीचा झटका सहन करावा लागणार आहे.

गेल्या साडेतीन महिन्यात घरगुती सिलिंडरसाठी ८४९ रुपये तर व्यावसायिक सिलिंडरसाठी एक हजार ४६१.५० रुपये पैसे मोजावे लागणार आहेत. गेल्या साडेतीन महिन्यात घरगुती सिलिंडरसाठी १७८. ५० रुपये व व्यावसायिक सिलिंडरसाठी २६४ रुपये वाढ करण्यात आली आहे. हा बोजा ग्राहकांना सहन करावा लागणार आहे.

नारायणगाव, जुन्नर, राजगुरुनगर व घोडेगाव येथील गॅस वितरकांकडून आंबेगाव तालुक्यात ५० हजार घरगुती ग्राहकांना सिलेंडरचे वाटप केले जाते. गॅस सिलिंडरच्या दरावर असलेले निर्बंध केंद्र सरकारने उठविल्याने गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक महिन्याला सिलिंडरच्या दरात बदल होत असतात. 

घरगुती गॅस सिलिंडरबरोबरच व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीतदेखील वाढत चाललेल्या आहेत. त्याचा फटका प्रामुख्याने हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेत्यांना बसणार आहे. "गेल्या सहा ते सात महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होत असल्याचे मंचर, घोडेगाव व अवसरी खुर्द येथील गॅस सिलिंडर विक्रेत्यांनी सांगितले.

"दरवाढ झाल्याने ग्राहक वाढीव पैसे देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे अनेकदा गॅस विक्रेते व ग्राहकांमध्ये संघर्ष होतो.'' असे अवसरी खुर्द येथील गॅस विक्रेत्यांनी सांगितले. वाढत्या महागाईमध्ये गॅस सिलेंडरची भर पडली आहे. संसाराचा गाडा हाकताना कसरत करावी लागते. हेच का अच्छे दिन... असा संतप्त सवाल मंचर ग्रामपंचायत सदस्या माणिक संतोष गावडे यांनी केला.  

Delhi Elections : दिल्लीत झालेल्या पराभवावर काँग्रेस म्हणते...
नोव्हेबर २०१९ - 
   १४.२ किलो (घरगुती) साठी ६७०.५० रुपये, 
   १९ किलो (व्यावसायिक) साठी एक हजार १९७ रुपये  
डिसेंबर २०१९ - 
   १४.२ किलो साठी ६८४. ५० रुपये, 
   १९ किलो साठी एक हजार २६० रुपये 
जानेवारी २०२० - 
  १४.२ किलो साठी ७०३. ५० रुपये, 
   १९ किलो साठी एक हजार २३५.५० रुपये  
१ फेब्रुवारी - 
   १४.२ किलो साठी ७०३ रुपये, 
   १९ किलो साठी एक हजार ४६१.५० रुपये
१२ फेब्रुवारी - 
   १४.२ किलो साठी ८४९ रुपये, 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com