Normal raining in Pune middle area today
Normal raining in Pune middle area today

पुण्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस; हवामान खातं म्हणतं...

पुणे : पुण्यात आज (ता.२५) काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. कोथरूड, शिवाजीनगर, सहकारनगर, फर्ग्युसन रस्ता, कॅम्प, वडगावशेरी, खराडी, मुंडवा, केशवनगर, हडपसर, खडकीसह इतर काही भागांमध्ये हलका स्वरूपाचा पाऊस पडला आहे.

वाऱ्यांमधील आर्द्रतेमुळे शहरात आणि परिसरात गेल्या पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण झाली आहे आणि त्याचमुळे हलका पाऊस पडला असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच, पुढील दोन दिवस शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणाची आणि हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ अनुपम काश्‍यपी यांनी दिली.

अटलजींचा 25 फूट उंचीचा अष्टधातूंचा पुतळा; एवढा आला खर्च

काश्‍यपी म्हणाले, "बंगालच्या उपसागरच्या दिशेने वाहणाऱ्या दक्षिण-पूर्व वाऱ्यांमध्ये, अरबी समुद्राच्या दिशेनी वाहणाऱ्या दक्षिण-पश्‍चिमी वाऱ्यांमध्ये तसेच उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये काही प्रमाणात आर्द्रता असल्यामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाड्यात ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण झाली आहे. वातावरणातील आर्द्रतेमुळे गेल्या दोन दिवसांमध्ये शहरातील काही भागांमध्ये हलका पाऊस पडला. 

पुणे : बहिणीच्या पतीने दुसरे लग्न केले म्हणून पाहा मेव्हण्याने काय केले?

शहरातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 2.4 अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली आहे. मंगळवारी (ता. 24) शहरातील किमान तापमान 17.1 अंश सेल्सिअस होते तर बुधवारी (ता. 25) हे तापमान 19.5 इतके नोंदविण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com