अटलजींचा 25 फूट उंचीचा अष्टधातूंचा पुतळा; एवढा आला एकूण खर्च

वृत्तसेवा
Wednesday, 25 December 2019

भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अष्टधातूंचा पुतळा लखनौ येथे उभारण्यात आला त्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. वाजपेयी यांच्या जयंतीदिवशीच आज या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.

लखनौ : भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अष्टधातूंचा पुतळा लखनौ येथे उभारण्यात आला त्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. वाजपेयी यांच्या जयंतीदिवशीच आज या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वाजपेयी यांच्या या पुतळ्याची 25 फूट उंची आहे. 4 हजार किलोग्रॅम पुतळ्याचे वजन असून पुतळ्यासाठी 90 टक्के तांबे वापरण्यात आले आहे. या पुतळ्याच्या उभारणीसाठी एकूण 89 लाख रुपये खर्च आला आहे. या वेळी मोदींच्या हस्ते अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा पायाभरणी समारंभही पार पडला.

पुणे : बहिणीच्या पतीने दुसरे लग्न केले म्हणून पाहा मेव्हण्याने काय केले?

यावेळी मोदी म्हणाले, 'सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणाऱ्यांनी हे सदैव लक्षात ठेवायला हवे, की अधिकार आणि कर्तव्ये यांची वाटचाल सोबत होत असते, केवळ अफवांमुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नका. अधिकार आणि कर्तव्ये यांची हातात हात घालून वाटचाल होत असते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायला हवे, असे खडे बोल त्यांनी दंगलखोरांना सुनावले. तोडफोड करणाऱ्यांनी स्वत:लाच विचारायला हवे, की आपण जे कृत्य केले ते बरोबर होते का? जे काही या आंदोलनांमध्ये जाळण्यात आले, ते त्यांच्या मुलांच्या वापरात आले नसते का? या आंदोलनांमध्ये जखमी झालेले लोक आणि पोलिस अधिकाऱ्यांचे काय झाले असेल,'' असे सवालही मोदींनी या वेळी केले.

राहुल गांधींच्या सांगण्यावर UPSCचा नाद सोडला, आमदार झाली; मंत्रीपदाचीही शक्यता

ते आम्ही सहज केले
370 व्या कलमाबाबत ते म्हणाले, की "" या जुन्या आजारावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यात आला. हा जुना आजार होता; पण त्याला सामोरे जाणे हीदेखील आमची जबाबदारी होती. आम्ही हे सहज करून दाखवले. याबाबत अनेकांच्या मनात पूर्वग्रह होते; पण तेही यानंतर पूर्णपणे चूर चूर झाले. रामजन्मभूमीच्या वादावरदेखील शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यात आला.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi unveils statue of Atal Bihari Vajpayee in Lucknow on his birth anniversary