तुम्हाला आता घरबसल्या ‘नोटीस ऑफ इंटिमेशन’ देता येणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जुलै 2020

अशा प्रकारे करता येईल फायलींग
या प्रणालीमध्ये कर्जव्यवहाराची माहिती, कर्ज रकमेच्या ०.२ टक्के मुद्रांक शुल्क, एक हजार रूपये फायलींग फी व दस्त हताळणी शुल्क यांचा तपशील भरल्यानंतर कर्जदाराने स्वत:चा फोटो वेब कॅमेरा किंवा स्मार्ट फोन माध्यमातून अपलोड करून ओळख पटविण्यासाठी आधार क्रमांक टाकल्यानंतर नोटीस तयार होणार आहे. त्या नोटीसची प्रिंट काढून त्यावर स्वाक्षरी करून आणि संबंधित बॅंकेकडून साक्षांकीत करून घ्यावी. ती नोटीस स्कॅन करून पीडीए फाईल प्रणालीमध्ये अपलोड करावयाची आहे. त्यामुळे कर्जदाराला तीस दिवसांच्या मुदतीत ती सादर करण्याचे असलेले बंधन पाळणे देखील शक्‍य होणार आहे.

पुणे - तुम्ही बॅंकेकडून कर्ज घेत आहात.. त्यासाठी तारण म्हणून फ्लॅट/प्लॉटची कागदपत्रे बॅंकेत जमा करीत आहात.. त्यानंतर ‘नोटीस ऑफ इंटिमेशन’ द्यायला दुय्यम निबंधक कार्यालयात समक्ष जाण्याची आता गरज नाही. घरबसल्या स्वत: अथवा दुसऱ्याच्या मदतीने तुम्हाला ‘नोटीस ऑफ इंटिमेशन’ देता येणार आहे. त्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून ई फायलींग प्रणालीत बदल केला आहे. त्यामुळे हे आता शक्‍य होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कर्ज घेताना जर साध्या गहाणाच्या पद्धतीने कर्ज घेतले, तर त्यासाठीचे गहाणखत दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन नोंदवावे लागते. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इक्विटेबल मॉर्गेज ही दुसरी एक पद्धत आहे. ज्यामध्ये कर्जदार तारण म्हणून आपल्या फ्लॅट/प्लॉट/शेती अशा स्थावर मिळकतीच्या मालकी हक्काची कागदपत्रे जसे की खरेदीखत, विक्री करारनामे संबंधित बॅंकेच्या ताब्यात देतो. कर्ज फिटेपर्यत ही कागदपत्रे बॅंकेकडे राहतात. या पद्धतीने कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना दुय्यम निबंधक यांच्याकडे ‘नोटीस ऑफ इंटीमेशन’ दाखल करावी लागते. त्यासाठी कर्जदारास दुय्यम निबंधक कार्यालयात स्वत: हजर राहावे लागते. अथवा ज्या बॅंकेकडून कर्ज घेतले, त्या बॅंकेच्या शाखेकडून इ-फायलींग प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाइन फायलिंग करता येते. मात्र  ही ई-फायलिंग सुविधा तुरळक बॅकांनीच आपल्या कर्जदारांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बहुतांशी बॅंका अथवा वित्तीय संस्थाच्या कर्जदारांना दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्यक्ष जाऊनच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

Breaking : आता पुणे जिल्हा परिषदेतही कोरोनाने केली एन्ट्री; वाचा सविस्तर! 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे कर्जदारास स्वत:ची नोटीस स्वत: ऑनलाइन फायलिंग करता येईल, अशी ई फायलींग ही सुधारीत प्रणाली नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने उपलब्ध दिली आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळेत बचत होण्याबरोबरच दुय्यम निबंधक कार्यालयात अनावश्‍यक होणारी गर्दी टाळणे शक्‍य होणार आहे.

पुण्याच्या महापौरांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; 'या' तारखेपर्यंत राहणार होम क्वॉरंटाईन!

अशा प्रकारे करता येईल फायलींग
या प्रणालीमध्ये कर्जव्यवहाराची माहिती, कर्ज रकमेच्या ०.२ टक्के मुद्रांक शुल्क, एक हजार रूपये फायलींग फी व दस्त हताळणी शुल्क यांचा तपशील भरल्यानंतर कर्जदाराने स्वत:चा फोटो वेब कॅमेरा किंवा स्मार्ट फोन माध्यमातून अपलोड करून ओळख पटविण्यासाठी आधार क्रमांक टाकल्यानंतर नोटीस तयार होणार आहे. त्या नोटीसची प्रिंट काढून त्यावर स्वाक्षरी करून आणि संबंधित बॅंकेकडून साक्षांकीत करून घ्यावी. ती नोटीस स्कॅन करून पीडीए फाईल प्रणालीमध्ये अपलोड करावयाची आहे. त्यामुळे कर्जदाराला तीस दिवसांच्या मुदतीत ती सादर करण्याचे असलेले बंधन पाळणे देखील शक्‍य होणार आहे.

येथे मिळेल माहिती
ही प्रणाली नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन सर्व्हिेसेस या सदराखाली ई फायलींग (नागरीक) या नावाने उपलब्ध आहे. ही प्रणाली सध्या पुणे शहर, पुणे ग्रामीण, मुंबई आणि मुंबई उपनगर या चार जिल्हयांकरिताच लागू करण्यात आली आहे. या प्रणालीविषयीची माहितीपुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध असून काही शंका असल्यास ८८८८००७७७७ या हेल्पलाइन वर संपर्क साधावा.

काय सांगता! राज्यातील पालकमंत्री पदे ही घटनाबाह्य!

नागरिकांच्या सोयीसाठी ई फायलींगच्या प्रणालीत सुधारणा करण्यात आली आहे. सध्याची पद्धत आणखी सुटसुटीत करण्यात आली असून त्यांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या कामासाठी आता नागरिकांना निबंधक कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही.
- ओमप्रकाश देशमुख (नोंदणी महानिरीक्षक)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: notice of intimation home