

Pune police arrest Akash Shinde, a notorious chain-snatcher involved in multiple thefts
Sakal
पुणे : शहरातील पादचारी आणि दुचाकीस्वारांना धमकावून सोनसाखळी, मोबाईल आणि दुचाकी लुटणाऱ्या सराईत चोरट्यास आंबेगाव पोलिसांनी अटक केली. तपासात आरोपीने पाच गुन्हे केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दागिने आणि दुचाकीसह चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आकाश नरहरी शिंदे (वय २७, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रूक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.