शिक्रापूर - शिक्रापूर (ता. शिरुर, जि. पुणे) येथील मलठण फाटा परिसरात सातारा (जि.सातारा) शहरातील एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी आलेल्या सातारा शहर पोलीसांवरच आरोपी लखन भोसले याने चाकू हल्ला केल्याने पोलिसांच्या स्वसंरक्षणार्थ केलेल्या उलट हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. शनिवारी (ता. ३०) रात्री सातच्या सुमारास हा प्रकार पुणे-अहिल्यानगर महामार्गावरच झाल्याने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवून वाहतूक नियमन करण्याची वेळ शिक्रापूर पोलिसांना करावी लागली.