
राज्यात निवडणूकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर बारामतीकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
बारामती : राज्यात निवडणूकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर बारामतीकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप
सत्तेपासून पाच वर्षे लांब असलेल्या बारामतीकरांनाही आता सत्तेची गोड फळे चाखण्यास मिळतील, याचा आनंद व्यक्त होत आहे. अजित पवार यांच्यावर मंत्रीमंडळातील महत्वाची जबाबदारी सोपविली जाणार, याबाबत बारामतीकरांच्या मनात शंका नाही, त्या मुळे त्यांनी मंत्रीपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर शहर व तालुक्यातील विविध विकासकामांना वेगाने चालना मिळणार हे निश्चित आहे.
साध्वी प्रज्ञासिंह यांना जिवंत जाळण्याची धमकी !
गेल्या पाच वर्षात निधी मिळविताना विरोधी पक्षात असल्याने अजित पवार यांच्यावरही मर्यादा येत होत्या. आता मात्र सत्तेत सहभागी असल्याने बारामतीतील रखडलेल्या विकास योजनांना पुरेसा निधी उपलब्ध होईल, हे निश्चित असल्याने बारामतीकरांना आता नक्की अच्छे दिन येणार अशी सध्या परिसरात चर्चा आहे. सरकार स्थापनेतील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका व अजित पवार यांचाही सत्तेतील सहभाग याचा फायदा बारामतीला नक्की होणार आहे.
विधानसभेच्या हंगमी अध्यक्ष बदलले
बारामतीच्या दृष्टीने मेडीकल कॉलेजसह पाचशे खाटांचे सुसज्ज रुग्णालय, बृहत बारामती पाणीपुरवठा योजना, विविध रस्त्यांची कामे, नीरा डावा कालवा दुरुस्ती, ब-हाणपूरनजिक पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरु करणे यासह इतरही अनेक प्रकल्पांवर अजित पवार यांना काम करायचे होते. सत्ता गेल्यानंतर साहजिकच या प्रकल्पांवर मर्यादा आल्या होत्या. पाटस बारामती इंदापूर हा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग तसेच बारामती फलटण रेल्वे मार्गाच्या कामालाही आता गती देणे त्यांना शक्य होईल.
अर्थमंत्रीपद घ्यावे अशी इच्छा....
राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी काम पाहावे, अशी अनेक बारामतीकरांची इच्छा आहे. या बाबत स्वताः पवार कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र विकासकामांच्या निधीच्या दृष्टीने इतर खात्यांपेक्षा अर्थखाते अधिक महत्वाचे असल्याची लोकांची भावना आहे.
अजित पवार आणि विकास हे समीकरण...
सत्ता नसतानाही अजित पवार यांनी निधी खेचून आणला, सत्तेत आल्यावर त्याला अधिक गती प्राप्त होईल. विकास आणि अजित पवार हे समीकरण असल्याने बारामतीतील प्रलंबित योजनांना नक्की गती मिळेल- संभाजी होळकर, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस.