अटकपूर्व जामीन किंवा इतर अर्जांवर आता थेट 'या' दिवशी निकाल

court.jpg
court.jpg

पुणे : विरोधात गुन्हा दाखल झाल्याने अटकपूर्व जामीन किंवा इतर कारणांसाठी आज व पूर्वी जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेले अर्ज आता बुधवारी (ता.15) निकालासाठी ठेवले जाणार आहेत. त्यामुळे अटकपूर्व जामीन होण्यासाठी दोन दिवस थांबावे लागणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा न्यायालयात असलेल्या मराठा ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित कर्मचाऱ्याकडे सर्व अर्ज दाखल करण्यात येत असतात. या अर्जांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित कर्मचाऱ्याकडे दाखल झालेले सर्व अर्ज 24 ते 36 तासानंतर संबंधित न्यायालयात सुनावणीसाठी पाठवले जाणार आहे. त्यानंतर त्यावर योग्य तो निकाल होईल.

याबाबत पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक यांनी सांगितले की, विविध अर्ज दाखल करण्यासाठी असलेल्या मराठा ऑफिसमधील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी उघड झाले. त्यानंतर त्वरित कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्या ठिकाणी दाखल असलेले अर्ज बुधवारी संबंधित न्यायालयात पाठवले जाणार आहेत. त्यामुळे ज्या वकिलांच्या पक्षकारांचे अर्ज दाखल आहेत किंवा ते दाखल करणार आहेत, त्यांनी सहकार्य करावे. सोमवार व त्या पूर्वीचे अर्ज मार्गी लागल्यानंतर पुन्हा सर्व सुरळीत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com