पुणेकरांनो, आता घरबसल्या करा बॅंकिंग व्यवहार

गजेंद्र बडे
मंगळवार, 14 जुलै 2020

सध्या पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे शहरात लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर स्वत:ला आणि पर्यायाने समाजाचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी हे आवश्यक आहे. त्यामुळे पुणेकरांनी घरबसल्या डिजिटल बॅंकिंगचा वापर करावा, असे आवाहनही या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे. 

पुणे : आपापल्या ग्राहकांना किरकोळ कामांसाठी बॅँकेच्या शाखेत यावे लागू नये, या उद्देशाने शहरातील विविध बॅंकांनी आॅनलाइन बॅंकिंग, मोबाईल बॅंकिंग, मोबाईल अॅप्स यासारखे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. 

या साधनांच्या माध्यमातून पुणेकरांना सर्व बॅंकिंग व्यवहार घरबसल्या करता येत आहेत. त्यामुळे नागरिकांना आता ऊठसूठ बॅंकेत जाण्याची गरज नसल्याचे मत महाराष्ट्र बॅंक आणि लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे शहरात लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर स्वत:ला आणि पर्यायाने समाजाचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी हे आवश्यक आहे. त्यामुळे पुणेकरांनी घरबसल्या डिजिटल बॅंकिंगचा वापर करावा, असे आवाहनही या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे. 

ऑनलाइन बॅंकिंगच्या माध्यमातून आपण बॅंकेत न जाता आपल्या घरातूनही पैसे ट्रान्स्फर करु शकतो. आपल्या खात्याच्या ट्रान्झकशनची (व्यवहार) माहिती मोबाईल मेसेजद्वारे आपल्याला कळू शकते. ई-मेलद्वारे बॅंक स्टेटमेंट मिळवू शकतो. शिवाय एटीएम कार्ड, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपण पैशाचे व्यवहार करू शकतो. यामुळे यापुढे आता फक्त पासबुक भरुन घेण्यासाठी बॅंकेच्या शाखेत जाण्याची गरज नसल्याचे महाराष्ट्र बॅंकेचे महाव्यवस्थापक (नियोजन) महेश महाबळेश्वरकर यांनी सांगितले.

Breaking : महाविद्यालय स्तरावर होणार परीक्षा?; 'यूजीसी'चे उपाध्यक्ष काय म्हणाले पाहा!

मोबाईल बॅंकिंग विशेषत: संबंधित बॅँकेच्या अॅप्समुळे आता घरबसल्या आरटीजीएस, एनईएफटीच्या माध्यमातून पेमेंट्स करता येतात, असे लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे क्षेत्रिय अधिकारी सुशील जाधव यांनी सांगितले. याशिवाय गुगल पे, फोन पे, पेटीएम यासारख्या विविध कंपन्यांच्या माध्यमातून पैशाचे ऑनलाइन व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. 

 

फक्त कर्जासाठी उपस्थिती अनिवार्य 

सर्वसामान्य नागरिकांना केवळ कर्जाचे प्रस्ताव सादर करणे, त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे देणे आणि संबंधित कर्ज प्रस्तावावर आणि बॅँकेकडील दप्तरांमध्ये स्वाक्षरी करण्यासाठी बॅँकेच्या शाखेत जाणे अनिवार्य आहे. त्यामुळे कर्जाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनीच बॅँकेत जावे. अन्य नागरिकांनी सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने पार पाडावेत, असेही आवाहन या वरिष्ठ बॅंकिंग अधिकाऱ्यांनी केले आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळणे अनिवार्य आहे ‌ त्यामुळे नागरिकांनी महाराष्ट्र बॅंकेच्या बॅंकिंग व्यवहारासाठी विविध डिजिटल माध्यमांचा वापर करावा‌. यासाठी महाबॅंक अॅप, एटीएम कार्ड, इंटरनेट बॅंकिंगचा अवलंब करता येईल.- महेश महाबळेश्वरकर, महाव्यवस्थापक (नियोजन), बॅंक ऑफ महाराष्ट्र

 

पुणे शहरातील विविध सहकारी सोसायट्या आणि बॅंकांनी आपापल्या ग्राहकांसाठी अनेक डिजिटल बॅंकिंग सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या सेवांचा आपापल्या घरात बसून वापर करता येतो. त्यामुळे केवळ कर्ज प्रकरणांशी निगडित व्यक्तींनाच बॅंकेत येण्याची गरज भासते.
- सुशील जाधव, क्षेत्रिय अधिकारी, लोकमान्य मल्टिपर्पज को-आॅपरेटिव्ह सोसायटी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now do banking transactions from home