esakal | कोथरुड-कर्वेनगरकर, आता स्वत:ला, कुटुंबाला जपणार अन् कोरोनाला हरविणार!

बोलून बातमी शोधा

Now Kothrud And karevenagar of Pune will Fight Against Corona.jpg

कोथरुडमधील सव्हें क्रमांक ८३, पोस्टमन कॉलनी, शालीनगर, पौड रस्त्याची डावी बाजू आणि कर्वेनगर-वारज्यातील एरंडवणे, रजपूत वीटभट्टी वसाहत, महादेव मंदिर परिसरांचा बाधित क्षेत्रात (कंटेन्मेट झोन) मोजण्यात आले आहे. त्यामुळे रहिवाशांवर बंधने लादण्यात आली आहे.

कोथरुड-कर्वेनगरकर, आता स्वत:ला, कुटुंबाला जपणार अन् कोरोनाला हरविणार!
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : अख्या पुण्यात कोरोना थैमान घालत असताना पुण्याचा पश्चिम भाग म्हणजे, कोथरुड-कर्वेनगर-वारजे मात्र, बिनधास्त राहिला. कारण पहिल्या टप्प्यात जेवढे-केवढे रुग्ण सापडले, तो आकडाकही पुढे सरकला नाही म्हणून ! पण याच कोथरुड, कर्वेनगर, वारज्याच्या काही भागांत आता गेल्या १०-१२ दिवसांत रुग्णांची 'भर पडल्याने हा परिसर बाधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) जाहीर झाला आहे. त्यामुळे कोथरुड-कर्वेनगरकरांवर स्वत:सह इतरांनाही जपण्याची जबाबदारी आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या साथीत तुम्ही साऱ्यांनी गाजविलेली 'आम्ही कोथरूडकर-आम्ही कर्वेनगर कर- घरी बसणार अन कोरोनाला हरविणार, ही शपथ तुम्हालाच खरी ठरवावी लागणार आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोथरुडमधील सव्हें क्रमांक ८३, पोस्टमन कॉलनी, शालीनगर, पौड रस्त्याची डावी बाजू आणि कर्वेनगर-वारज्यातील एरंडवणे, रजपूत वीटभट्टी वसाहत, महादेव मंदिर परिसरांचा बाधित क्षेत्रात (कंटेन्मेट झोन) मोजण्यात आले आहे. त्यामुळे रहिवाशांवर बंधने लादण्यात आली आहे.


पुणे : चौथ्या लाॅकडाउनमध्ये काय सुरू अन् काय बंद राहील? वाचा सविस्तर

पुणे शहरातील कोरोना रुग्णांची नोंद आतापयंत पावणेचार हजारांच्या घरात गेली आहे; तर प्रत्यक्षात १ हजार ६३० रुग्ण हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यातील १ हजार ९१० जण बरे झाले आहेत. इतक्या प्रमाणात कोरोनाची साथ पसरूनही सुरवातीपासून कोथरुड, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत रुग्णांची आटोक्यात राहिली. ते बरेही झाले. सध्या दोन भागांत १२ रुग्ण असल्याची नोंद आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांत कोथरुड, कर्वेनगर आणि वारज्यातील काही परिसरात नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महिना-दीड महिना बिनधास्त असलेल्या कोथरुड, कर्वेनगर आणि वारज्यात चिंता परसली आहे. कोथडकरांच्या चिंतेचे चिंतन करून महापालिकेने रुग्ण आढळून आलेला भाग बाधित क्षेत्रात समावून घेतला आहे. तेव्हाच, खबरदारीच्या विशेषत : कोरोना पसरणार नाही आणि कोथरुडकर, कर्वेनगर पूर्णपणे सुरक्षित राहतील, याची व्यवस्था महापालिकेने केली आहे.

पुण्यात एका आयटीतील कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग 

शहराच्या विविध भागांत बुधवारी रात्रीपर्यत ६९ बाधित क्षेत्र होते, त्यातील २४ भागांत गेल्या पंधरा एकही रुग्ण आढळून आलेला नसल्याने तो भाग वगळण्यात आला आहे. तर नव्याने काही भाग जोडताना कोथरुडचा समावेश झाला आहे. ही बाब कोथरुडकरांना सावध करणारी असली तरी, कोरोनाविरोधात सावधपणे लढाईचे संकेत देणारी आहे. त्यामुळे आता खऱया अर्थाने 'आम्ही कोथरडकर, आम्ही कर्वेनगरकर घरीच राहणार अन कोरोनाला हरविणार', याची परीक्षा होणार आहे. त्यात अव्वल ठरण्यासाठी तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल.

पुणे विभागात काय आहे कोरोनाची स्थिती पाहा...