पुण्यात एका आयटीतील कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग 

corona logo1.jpg
corona logo1.jpg

वाघोली (पुणे) : वाघोलीत एका सोसायटीमध्ये राहणारा 31 वर्षीय आयटी कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या कुटुंबातील दोघांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्याच्या संपर्कातील अन्य नऊ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गायकवाड यांनी दिली. 

वाघोलीतील रुग्णांची संख्या आठ झाली असून चार जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी तो किडनी स्टोनच्या उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात गेला होता. चार- पाच दिवसांपूर्वी त्याला कोरोनाची काही लक्षणे जाणवू लागल्याने तो पुन्हा रुग्णालयात गेला. त्याला कोरोना चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्याने तेथेच चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आल्याने त्याला आज त्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

वाघोलीत आतापर्यंत आठ रुग्ण आढळून आले असून त्यातील चार जण स्थानिक असून त्यांना 15 दिवसांपूर्वीच डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन रुग्ण हे पोलिस कर्मचारी असून ते शहरातील पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यातील एकाची पत्नीही बाधित आहे. उपचार सुरू असलेल्या चारही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यातील दोघांना दोन ते तीन दिवसात डिस्चार्ज मिळण्याची शक्‍यता आहे. नागरिकांनी घाबरून न जाता दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीने केले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी- क्लिक करा

केसनंद येथील रुग्णाला डिस्चार्ज 
केसनंद येथील 47 वर्षीय रुग्ण ठणठणीत बरा झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. केसनंदकरांना त्याचे उत्साहात स्वागत केले. केसनंद आता कोरोना मुक्त झाले आहे. 

मांजरीही कोरोना मुक्त होणार 
मांजरीत तीन रुग्ण आढळून आले होते. त्यातील एका 70 वर्षीय रुग्णाचे निधन झाले तर कोरोना बाधित महिला डॉक्‍टरला डिस्चार्ज मिळाला. तिसऱ्या रुग्णालाही दोन ते तीन दिवसात डिस्चार्ज मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मांजरीही लवकरच कोरोना मुक्त होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com