पुणे : आता आंतरजिल्हा वाहतुकीच्या परवानगीच्या निर्णयाकडे लक्ष !

Now look at the decision to allow inter-district transport in Pune
Now look at the decision to allow inter-district transport in Pune
Updated on

पुणे : दिल्ली, बंगळूर, चेन्नई, कोलकत्ता, हैदराबाद, जयपूर या सारख्या शहरांतून नागरिकांना विमान अथवा रेल्वेने पुण्यात येणे शक्य आहे. पण, पुण्यातून सातारा असो अथवा नगरला जाणे नागरिकांना शक्य नाही, कारण सीमा अजूनही बंद आहेत. आंतरराज्य  वाहतुकीला परवानगी दिली असली तरी, जिल्हातंर्गत वाहतुकीला परवानगी कधी मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः जिल्ह्यांच्या सीमांवर राहणाऱया नागरिकांना त्याचा फटका बसत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोना लॉकडाउन शिथिल करताना 28 मे रोजी केंद्र सरकारने जिल्हातंर्गत, आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी दिली आहे. महाराष्ट्र सरकारने जिल्हातंर्गत वाहतूक खुली केली आहे. मात्र, आंतरजिल्हा वाहतुकीला अद्याप परवानगी दिलेली नाही. उदा ः नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील नागरिक खरेदीसाठी शिरूरला जातात. मात्र, दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा सील असल्यामुळे त्यांना अडचणी येत आहेत. तसाच प्रकार सातारा रस्त्यावर शिरवळबाबत होत आहे. तेथील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांत काम करणारे कामगार चेलाडी फाटा, बनेश्वर, खेड शिवापूर परिसरातून ये-जा करतात. त्यांनाही काही वेळा अडचणी येत आहेत. तसाच प्रकार सातारा, नगर, मुंबई आदी जिल्ह्यांतून नोकरी, व्यवसाय उद्योगांत काम करणाऱया नागरिकांना अडचणी येत आहेत. 
----------
पाकिस्तानकडून पुन्हा नापाक कृत्य; भारतीय राजदूतांना धमकावण्याचा प्रयत्न
-----------
या बाबत व्यापारी सुरेश चौधरी म्हणाले, माझा पॅकेजिंगचा माल मला मुंबईवरून आणावा लागतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी मुंबईला जावे लागते. एकदा पोलिसांचा पास मिळाला. मात्र, आता तो मिळत नाही. त्यामुळे कामावर परिणाम होत आहे. तसेच लॉकडाउनपूर्वी गावाकडे गेलेल्या अनेकांच्या नातेवाईकांनाही फटका बसत आहे. कोणाचा मुलगा, मुलगी किंवा आई-वडिल गावाकडे अडकले आहेत. जिल्हाबंदीच्या आदेशामुळे त्यांना पुण्यात येणे अवघड झाले आहे. 

अनेकांना जिल्ह्यांच्या सीमांवर पोलिसांकडून अडविले जाते. त्यावेळी पोलिसांची मनधरणी केल्यावर पुढे सोडले जाते, असाही काहीजणांचा अनुभव आहे. परराज्यातून विमान आणि रेल्वे वाहतूक झाली आहे. जिल्ह्यातंर्गत वाहतूक सुरू झाली आहे. तर, आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी का नाही, असाही प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. नागरिक चिन्मय वैद्य म्हणाले, माझी आजी साताऱयाला बहिणीकडे आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ती तेथे राहत आहे. तिची सातत्याने नियमितपणे आरोग्य तपासणी करावी लागते. ते डॉक्टर पुण्यात आहेत. पोलिसांचा पासही मिळत नाही. आता काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

या बाबत वरिष्ठ पोलिस सूत्रांकडे विचारणा केली असता, गृह खात्याने या बाबत अभिप्राय मागितला होता. त्यानुसार आम्ही तो दिला आहे. परंतु, अंतिम निर्णय मुख्यमंत्री कार्यालयातून घेतला जाईल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे आम्ही देखील त्याची वाट पाहत आहोत. राज्य सरकारने 30 मे रोजी शिथिलीकरणाचे काही आदेश देताना, आंतरजिल्हा वाहतुकीबाबत स्वतंत्र निर्णय घेतला जाईल, असे म्हटले होते. परंतु, या बाबत अद्याप आदेश निघालेला नाही, असेही त्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com