
तुम्ही सिगारेट ओढल्यानंतर त्याचे थोटके उघड्यावर टाकताय का? आता तुम्ही टाकलेल्या सिगारेटच्या थोटक्यांची संख्याही मोजण्यात येत आहे. होय...! शहरातील कोणत्या भागात आणि किती प्रमाणात सिगारेट ओढण्यात येत आहे. याची दखल घेण्यासाठी पुण्यातील तरुणांनी "चॉक फॉर शेम' या अनोख्या मोहिमेची सुरवात केली आहे.
पुणे : तुम्ही सिगारेट ओढल्यानंतर त्याचे थोटके उघड्यावर टाकताय का? आता तुम्ही टाकलेल्या सिगारेटच्या थोटक्यांची संख्याही मोजण्यात येत आहे. होय...! शहरातील कोणत्या भागात आणि किती प्रमाणात सिगारेट ओढण्यात येत आहे. याची दखल घेण्यासाठी पुण्यातील तरुणांनी 'चॉक फॉर शेम' या अनोख्या मोहिमेची सुरवात केली आहे. नागरिकांकडून सिगारेट ओढल्यानंतर त्याची थोटके रस्त्यावर सर्रासपणे टाकण्यात येत असल्यामुळे त्यांना उचलण्याऐवजी त्या भोवती खडूने रिंगण बनवत तेथे आकडे टाकण्यात येत आहे. सिगारेट विरोधात नागरिकांची जनजागृती करण्यासाठी पुणे प्लॉगर्सतर्फे ही मोहीम राबविण्यात येत आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुणे प्लॉगर्सचे संस्थापक विवेक गुरव म्हणाले, 'देशातील विविध भागांमधून उद्योग, नोकरी आणि शिक्षणासाठी शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असून त्यांना सिगारेटची सवयी लागण्याचे प्रमाणही तितकेच जास्त आहे. शहरात सिगारेट ओढण्याचे प्रमाण किती आहे याची जाणीव लोकांना व्हावी म्हणून रस्त्यावरील सिगारेटच्या थोटक्याभोवती रिंगण करत तेथे संख्या टाकतो. त्यामुळे एका ठराविक अंतरामध्ये एकूण किती सिगारेट टाकण्यात येतात हे समजते. सिगारेटच्या शेवटी पिवळ्या भागात असलेलं फिल्टर म्हणजेच सिगारेटचे थोटके आणि याची पुर्नप्रक्रिया आव्हानात्मक ठरते. अशी लाखो सिगारेटचे थोटके मुठानदीपात्रात आढळतात.''
- 'स्कूल चले हम'; आठ महिन्यानंतर जिल्ह्यातील शाळांची घंटा वाजली!
'जंगली महाराज रस्त्यावर करण्यात आलेल्या प्रयोगात 200 मीटर अंतरावर आम्हाला 88 थोटके आढळून आले आहे. तर या ठिकाणी काही संदेश सुद्धा लिहीत आहोत. त्यामुळे सिगारेट ओढणारे जेव्हा लाजेचं हे रिंगण व संदेश रस्त्यावर, उद्यानात किंवा पादचारी मार्गावर पाहतील तेव्हा थोडी का होईना त्यांना खरच समजूत येईल,'' अशी अपेक्षाही गुरव यांनी व्यक्त केली.
Edited By - Prashant Patil