
पुणे : सातबारा उताऱ्यावरील वारसा नोंदी, कर्ज बोजा दाखल करणे अथवा कमी करणे, अपाक (अज्ञान पालककर्ता), एकत्र कुटुंब मॅनेजर (एकुमॅ) नोंद कमी करणे आदी नागरिकांची कामे वेळेत मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ई-हक्क प्रणालीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, दिलेल्या मुदतीत कामे मार्गी न लावणाऱ्या तलाठ्यांना आता जिल्हाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटीचे ‘बक्षीस’ मिळणार आहे.