आता आमच्या दाव्यात न्याय होणार - सचिन घुमटकर

CoronaVirus
CoronaVirus
Updated on

पुणे - बावधनमध्ये आम्ही घेतलेल्या एका जमिनीवर अनधिकृतपणे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्याबाबत स्टे मिळण्यासाठी आम्ही कोरोनापूर्वी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र लॉकडाऊन काळात त्यावर काही सुनावणी झाली नाही. पण आता दिवाणी दाव्यांच्या सुनावणीसाठी चार न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आल्याने आमच्या दाव्यावर सुनावणी होऊन त्यात स्टे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असा विश्वास सचिन घुमटकर यांनी व्यक्त केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घुमटकर यांच्यासह काही जणांनी बावधन येथे जमीन खरेदी केली होती. मात्र त्या जमिनीच्या सातबार्‍यावर घुमटकर यांचे नाव आले नव्हते. दरम्यानच्या काळात संबंधित जमीन मालकाच्या मुलाने एका बांधकाम व्यावसायिकाला विकसन करार करून जमीन विकसित करायला दिली. घुमटकर यांनी खरेदी केलेल्या जमिनीवर बांधकाम सुरू झाल्याने त्यावर स्टे मिळण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र लॉकडाऊनमुळे त्यावर सुनावणी होऊ शकली नाही.

दिवाणी  दाव्यांच्या सुनावणीसाठी चार वरिष्ठ स्तर न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. आजपासून त्यांच्या कोर्ट हॉलमध्ये दाव्यांवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे पक्षकारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

र्यादित कामकाजामुळे थांबलेल्या सुनावणीचा दिलीप तांबे यांना देखील फटका बसला आहे. तांबे यांच्या जमिनीवर एका व्यक्तीने मालकी हक्क सांगितला आहे. याबाबत त्यांनी 2009 साली येथील न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला आहे. अकरा वर्ष त्यावर सुनावणी झाल्यानंतर मार्चमध्ये हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी होते. मात्र तेवढ्यात लॉकडाऊन सुरु झाला आणि तांबे यांचे प्रकरण आणखी रखडले. याबाबत ते सांगतात की, "गेल्या अकरा वर्षांपासून मी माझ्या जमिनीसाठी लढा देत आहे. मार्चमध्ये ते प्रकरण संपण्याच्या मार्गावर होते. मात्र तेवढ्यात कोरोना आल्याने सुनावणीवर पाणी फिरले. मात्र आता न्यायाधीशांची नियुक्ती केल्याने माझ्या प्रकरणावर त्वरित निकाल, होईल अशी आशा निर्माण झाली आहे."

चार न्यायाधीशांच्या नियुक्तीमुळे तात्काळ प्रकरणांवर त्वरित सुनावणी घेणे शक्य होणार आहे. त्याचा अनेक पक्षकारांना फायदा होईल. अंतिम सुनावणीसाठी असलेले व तात्काळ प्रकरणांची यादी सर्व वकिलांकडून मागवून घेण्यात आली आहे. आता नियमित सुनावणी सुरू करणे गरजेचे आहे.
- ऍड. नितीन झंजाड

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com