esakal | वरसगाव ओव्हरफ्लो; खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवला
sakal

बोलून बातमी शोधा

Varasgaon_Dam

खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांत एकूण 28.34 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे 97.24 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.

वरसगाव ओव्हरफ्लो; खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : वरसगाव धरण जवळपास पूर्ण भरले असून खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात रविवारी (ता.23) दुपारी दोन वाजल्यापासून पाच हजार 136 क्‍युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला.

खडकवासला धरण साखळीतील पानशेत आणि खडकवासला ही दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यापाठोपाठ आता वरसगाव धरणही 99 टक्के भरले आहे. तर, टेमघर धरणातही 83 टक्के पाणीसाठा झाला आहे. काल पावसाचा जोर असल्यामुळे खडकवासला धरणातून नदीपात्रातील विसर्ग बंद करण्यात आला होता.

केंद्र सरकारच्या धोरणावर अजित पवारांचा सावध पवित्रा; सरसकट वाहतुकीबाबत वेगळा निर्णय घेणार?​

परंतु धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पाऊस सुरू झाला. त्यामुळे खडकवासला धरणातून रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून विसर्ग वाढवण्यात आल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली. नीरा देवघर धरणही जवळपास पूर्ण भरले असून, नीरा नदीत 750 क्‍युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीपात्राच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांत एकूण 28.34 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे 97.24 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी 28.94 टीएमसी (99.43 टक्के) पाणीसाठा होता. रविवारी दिवसभरात टेमघर, वरसगाव, पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रत्येकी 10 मिलिमीटर आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक मिलिमीटर पाऊस झाला.

मोठी बातमी : कोविडची लस ७३ दिवसांत येणार नाही; वाचा सीरम इन्स्टिट्यूटचा खुलासा

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये, कंसात टक्केवारी : 
टेमघर - 3.07 (82.94)
वरसगाव - 12.65 (98.65)
पानशेत - 10.65 (100)
खडकवासला - 1.97 (100)

इतर धरणांतील पाणीसाठा
भामा-आसखेड - 6.23 (81.23)
पवना - 7.48 (87.96)
मुळशी - 18.46 (100)
भाटघर - 23.50 (100)
नीरा देवघर - 11.58 (98.72)
वीर - 9.41 (100)
उजनी - 41.73 (77.88)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image