बारामतीतच रुग्णांचे होणार डायलिसीस; ​पुण्याचा हेलपाटा वाचला

Now Patients will undergo dialysis in Baramati
Now Patients will undergo dialysis in Baramati

बारामती : डायलिसीस करण्यासाठी बारामतीकरांना आता पुण्याला जायची गरज पडणार नाही. सर्वसाधारण व कोरोनाग्रस्तांसह ज्यांना रक्तातील काविळ आहे व जे कोरोनाग्रस्त आहे, अशा रुग्णांचेही डायलिसीस बारामतीत शक्य होणार आहे. बारामतीकरांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे.  

बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयात दोन तर एमआयडीसीतील महिला रुग्णालयात दोन अशी चार डायलिसीस मशीन्स आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांसाठी उपलब्ध करुन दिली आहेत. या मुळे बारामतीच नव्हे तर पंचक्रोशीतील डायलिसीस रुग्णांची सोय या निमित्ताने होणार असून पुण्याच्या यंत्रणेवरील ताणही कमी होण्यास मदत होणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

प्रारंभी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात डायलिसीस सुविधा सुरु झाली, मात्र कोरोनामुळे सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे रुपांतर कोविड केअर सेंटरमध्ये झाल्याने सर्वसाधारण रुग्णांसाठीची ही डायलिसीस सुविधा बंद करण्यात आली होती. आता मात्र ज्या कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना डायलिसीसची गरज असेल तर त्याला या दोनपैकी एक मशीन वापरण्यात येणार आहे, तर एचबीएसएजी ही रक्तातील काविळ असलेल्या कोविड रुग्णांच्या डायलिसीससाठी वापरली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी दिली. बारामतीत सुदैवाने असे दोन्हीही रुग्ण आढळलेले नव्हते, आता मात्र असे रुग्ण आले तरी त्यांचे बारामतीतच डायलिसीस करणे शक्य होणार आहे. 

दरम्यान ज्याला एचआयव्ही, एचबीएसएजी, हिपॅटायसिस सी व कोविड नाही अशा इतर रुग्णांसाठी महिला रुग्णालयात अजित पवार यांनी दोन डायलिसीस मशीन उपलब्ध करुन दिल्या. या साठी वेगळा आरओ प्लँट देखील कोविड निधीतून कार्यान्वित करण्यात आला आहे.  सकाळच्या सत्रात दोन व दुपारच्या सत्रात दोन असे चार रुग्ण दररोज (रविवार वगळता) या डायलिसीस सुविधेचा लाभ घेऊ शकतील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यांच्याशी साधा संपर्क
•    डॉ. सदानंद काळे- वैद्यकीय अधीक्षक, सिल्व्हर ज्युबीली रुग्णालय- 9689154522
•    डॉ. बापू भोई, वैद्यकीय अधिकारी, महिला ग्रामीण रुग्णालय- 9860461807
•    शिवानी गायकवाड- डायलिसीस टेक्निशियन- 9067520715
•    श्रीमती थोरात- परिचारिका- 7887451223.

कोणी कोठे संपर्क करावा. 
•    कोरोनाग्रस्त व रक्तातील काविळ असलेले कोरोनाग्रस्त- सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय
•    एचआयव्ही, हिपॅटायसिस सी, कोविड, एचबीएसएजी काविळ नसलेल्या सर्वांनी एमआयडीसीतील महिला रुग्णालयाशी संपर्क साधावा. 

तुम्ही पासपोर्ट काढताय? फसव्या संकेतस्थळापासून राहा सावध!

बारामती होतेय मेडीकल हब.....
बारामतीत येत्या काही महिन्यात शासकीय वैद्यकीय रुग्णालय कार्यान्वित होणार आहे. डायलिसीसचीही सुविधा सुरु झाली असून सिटी स्कॅन, एमआरआयसह इतर सर्वचसुविधा बारामतीतील खाजगी व शासकीय दवाखान्यातून कमी अधिक प्रमाणात उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या कार्यान्वयनानंतर बारामती पश्चिम महाराष्ट्रातील एक मेडीकल हब म्हणून उदयास येणार आहे. दरम्यान अजित पवार यांचा बारामतीत टाटा ट्रस्टच्या मदतीने कॅन्सर हॉस्पिटल सुरु करण्याचाही प्रयत्न सुरु आहे. त्या मुळे बारामतीच्या अर्थव्यवस्थेला या सुविधांमुळे भविष्यात चालना मिळणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com