तुम्ही पासपोर्ट काढताय? फसव्या संकेतस्थळापासून राहा सावध!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 December 2020

अर्जदार अधिकृत मोबाइल ऍप mPassportSeva वापरू शकतात, जे Android आणि ios application स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकतात.

पुणे : पासपोर्ट विभागाच्या बनावट संकेतस्थळ आणि मोबाइल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून अर्जदारांकडील माहिती संकलित करण्यात येत असल्याची बाब परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे नागरिकांनी फसव्या संकेतस्थळास भेट देऊ नये. तसेच, पासपोर्ट सेवांशी आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन पासपोर्ट विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

PowerAt80: शेतीचे अर्थकारण जाणणारा द्रष्टा नेता​

बनावट संकेतस्थळावरून अतिरिक्त जादा शुल्क आकारून त्यांना वेळ उपलब्ध करुन सेवा देत आहेत. यापैकी काही बनावट संकेतस्थळाचे डोमेन नोंदणीकृत आहेत. त्यात ".org, .in, .com" उदाहरणार्थ - www.indiapassport.org, www.onlinepassportindia.com, www.passportinidiaportal.in, www.passport-seva.in, www.applypassport.org अशी काही संकेतस्थळ निदर्शनास आली आहेत.

Breaking: सरळसेवा भरतीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण; लाखो विद्यार्थ्यांचे राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

त्यामुळे भारतीय पासपोर्ट आणि संबंधित सेवांसाठी नागरिकांनी फसव्या संकेतस्थळास भेट देऊ नये. तसेच, पासपोर्ट सेवांशी आर्थिक व्यवहार करू नये. पासपोर्ट व संबंधित सेवांसाठी भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकृत संकेतस्थळ www.passportindia.gov.in हे आहे. तसेच, अर्जदार अधिकृत मोबाइल ऍप mPassportSeva वापरू शकतात, जे Android आणि ios application स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी ► क्लिक करा 

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beware from fake passport websites