Lockdown : पीएमपी आर्थिक अडचणीत! आता भाडेतत्त्वावर देणार बस

Now PMP will  give buses are on lease.jpg
Now PMP will give buses are on lease.jpg
Updated on

पुणे : लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या पीएमपीने आपल्या बस भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी कंपन्यांना या बस उपलब्ध होणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशात 24 मार्चपासून लॉकडाउन सुरू झाला आहे. तेव्हापासून पीएमपीची शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये बससेवा बंद आहे. या दोन्ही शहरांत सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांची वाहतूक पीएमपीकडून सुरू आहे. त्यासाठी सुमारे 120 बस दररोज धावत आहेत. सुमारे 1400 बस सध्या विविध आगारांत उभ्या आहेत.

Video : आठ बाय आठ फुटांच्या खोलीत, कसं पाळायचं डिस्टंसिंग?

चाकण, हिंजवडी, भोसरी, चिंचवड, रांजणगाव आदी ठिकाणी अनेक कंपन्या सुरू आहेत. त्यांच्या कर्मचाऱयांची वाहतूक करण्यासाठी या बस वापरता येतील, असे आवाहन पीएमपीने केले आहे. या कंपन्यांना दरमहा करारानुसार बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी 83 रुपये 50 पैसे प्रती किलोमीटर दराने आकारणी होणार आहे. दरमहा किमान दोन हजार किलोमीटरचे पैसे संबंधित कंपनीकडून आकारले जाणार आहेत.

ज्या कंपन्यांना बस भाडेतत्त्वावर हव्या आहेत, त्यांनी सविस्तर माहितीसाठी 020-24503300 किंवा 9881495582 या मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com